Friday, May 3, 2024
Homeनाशिकएक व्यक्ती, एक पद निर्णयाला फाटा

एक व्यक्ती, एक पद निर्णयाला फाटा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसच्या (Maharashtra Mahila Pradesh Congress) कार्यकारिणीमध्ये नाशिक महिला काँग्रेस शहराध्यक्षा (Nashik Women’s Congress City President) तथा नगरसेविका वत्सला खैरे (Corporator Vatsala Khaire) यांची कार्यकारी सदस्य (Executive member) तर

- Advertisement -

त्यांच्या कन्या स्वाती जाधव (खैरे) (Swati Jadhav (Khaire)) यांची थेट ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी (Rural Women District President) निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे काही वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदाला न्याय मिळाला आहे.

दरम्यान, या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या उदयपूर (udaypur) चिंतन शिबिरातील एक व्यक्ती, एक पद घराणेशाही या चर्चा नुसत्या वांझोट्या ठरल्या असून पक्षाच्या या निर्णयाला पक्षानेच हरताळ फासला असल्याच्या प्रतिक्रिया पक्षात प्रकर्षाने उमटत आहेत. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात (Congress Contemplation Camp) पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी वीस ठराव संमत करण्यात आले होते. त्यात एक व्यक्ती, एक पद व घराणेशाहीला आळा घालणे हे ठराव चर्चेचे विषय ठरले होते. मात्र, त्यास पंधरवडा लोटत नाही तोच या चर्चा नुसत्या गप्पा ठरल्याचे या निवडीवरून सिध्द झाले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डिसुजा यांनी जाहीर केलेली महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी (Maharashtra Pradesh Women Executive) त्यास निमित्त ठरली आहे. कार्यकारिणीत नाशिकमधील (nashik) खैरे परिवारावर विशेष मेहरबानी दिसून येत आहे. वत्सला खैरे या नगरसेविका (Corporator) व मागील 13 वर्षांपासून महिला शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. आता त्यांचा प्रदेश महिला कार्यकारिणीत कार्यकारी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे आता त्यांच्याकडे एकूण तीन पदांची जबाबदारी आहे. ममता पाटील यांनी राजीनामा (Resigned) दिल्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मागील दीड ते दोन वर्षांपासून रिक्त होते. या जागी वत्सला खैरे यांची कन्या स्वाती जाधव (खैरे) यांची नियुक्ती करत त्यांना ग्रामीण अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. वत्सला खैरे यांचा मुलगा बबलू खैरे देखील मागील काही वर्षांपासूम कॉग्रेस मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष आहे.

ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपद मिळावे, अशी मागणी पक्षाकडे आम्ही केलेली नव्हती. ग्रामीण भागातील महिलेलाच या पदावर संधी मिळावी, अशी आमची भूमिका आहे. पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने आदेश दिल्यास आम्ही हे पद सोडण्यास तयार आहोत.

– बबलू खैरे, काँग्रेस मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या