Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, 'त्याने' कुटुंबातील तिघांवर चढवली रेंज रोव्हर

धक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, ‘त्याने’ कुटुंबातील तिघांवर चढवली रेंज रोव्हर

मोहाली | Mohali

परिवारात भांडण झाल्यामुळे एकाने आपल्याच परिवारातील तिघांच्या अंगावर रेंज रोव्हर कार चढवल्याची घटना घडली आहे. घटनेत एकाचा मृत्यू झाला झाला असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहालीच्या मनौली गावात एका तरुणाने रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील तीन जणांवर कार चालवली. या घटनेत आरोपीचा चुलत भाऊ रणजित सिंग (40) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवेंदर (27) असे संशयिताचे नाव असून तो मनौली गावाचा रहिवासी आहे. घटनेनंतर संशयित फरार झाला झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; ‘या’ उपोषणामुळे आले होते राज्यभर चर्चेत

याप्रकरणी बलजीत सिंग यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ते एकत्र कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या काकाचा मुलगा देवेंद्र याचे घरात भांडण झाले होते. त्यामुळे तो रागावला आणि त्याची रेंज रोव्हर गाडी घेऊन घराबाहेर पडू लागला. हे पाहून त्याचा भाऊ रणजित सिंग, काका जर्नेल सिंग, देवेंदरची आई मनजीत कौर (काकू) त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांना घाबरवण्यासाठी त्याने वेगाने कार त्यांच्या दिशेने वळवली.

वादग्रस्त कार्यकारी अभियंता कंकरेज यांची अखेर बदली

कारच्या धडकेने ते सर्वजण जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. तिघांनाही मोहालीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रणजित सिंगला मृत घोषित केले. घटनेच्या वेळेपासून संशयित फरार आहे. या घटनेत संशयिताची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या