Friday, May 3, 2024
Homeनगरएक रुपयात पिकविमा तरीही शेतकर्‍यांचा सहभाग कमी

एक रुपयात पिकविमा तरीही शेतकर्‍यांचा सहभाग कमी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

शेतकर्‍यांच्या (Framer) पिकांना नैसर्गिक संकटापासून (Natural to Crops Crisis) संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Bima Yojana) सुरू केली आहे. राज्य सरकारने पुढाकार घेत शेतकरी हिस्सा स्वतः भरीत एक रुपयात पिक विमा योजना (One Rupee Crop Insurance Scheme) राबविली आहे. मात्र पावसाअभावी काही भागात पेरण्या झालेल्या नसल्याने व योजनेची माहिती बर्‍याच शेतकर्‍यापर्यंत पोचलेली नसल्याने या योजनेत शेतकर्‍यांचा म्हणावा असा सहभाग दिसत नाही. राहाता तालुक्यात 15 जुलैपर्यंत अवघ्या 13 हजार शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

अतिवृष्टी (Heavy Rain), पावसाचा खंड, पूर अशा विविध नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकर्‍यांच्या पिकांचे होणारी नुकसानभरपाई (Crops Compensation) करण्यासाठी केंद्राने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. पूर्वी यामध्ये शेतकरी हिश्श्या बरोबर केंद्र सरकार व राज्य सरकार समप्रमाणात आपला हिस्सा टाकत होते. मात्र राज्यात आलेल्या महायुती सरकारने अवघ्या एक रुपयात पिक विमा योजना सुरू करून शेतकर्‍यांच्या वाट्याचा हिस्साही भरण्यास यावर्षीपासून सुरुवात केली आहे.

प्रणिता सोमण हिस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

त्यामुळे शेतकर्‍यांना अवघ्या एक रुपयात आपल्या संपूर्ण शेतातिल पिकांचा पिकविमा काढता येणार आहे. अंतिम मुदत 31 जुलै असून येत्या पंधरा दिवसांचा कालावधी अद्याप बाकी आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने बर्‍याच भागात पेरण्या झालेल्या नाहीत तसेच शासनाच्या या चांगल्या योजनेची माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोचलेली नसल्यामुळे पिक विमा भरणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अद्याप गेल्या वर्षीच्या तुलनेने अडीच हजारांनी कमी दिसत आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुरावामुळे गेल्या वर्षी अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खरीप पीकविम्याचे परतावे मिळाले होते. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे पावसाचा खंड व ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणारी संभावित अतिवृष्टी याचा फटका खरीप पिंकाना बसण्याची शक्यता आहे. जवळपास मोफतच असणार्‍या या पिकविमा योजनेमध्ये शेतकर्‍यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.यासाठी कृषी विभाग व संबंधित यंत्रणे कडून जनजागृती होणे अपेक्षित असल्याची चर्चा जाणकार व्यक्त करत आहेत.

श्रीरामपुरातील फुड कॅफेत अश्लिल चाळे

सर्वाधीक राहाता मंडळात 4 हजार 213 शेतकर्‍यांनी पीक विमा भरला आहे. त्याखालोखाल पुणतांबा 3 हजार 190 शेतकरी, लोणी 2 हजार 618, बाभळेश्वर मंडळात 2 हजार 28 व सर्वात कमी शिर्डी मंडळात 1 हजार 21 शेतकर्‍यांनी पिकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. राहाता तालुक्यात 2020-21 मध्ये 28 हजार शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग घेतला होता. 2021-22 मध्ये त्यात घट होवुन हा आकडा 18 हजारांवर आला गेल्या वर्षी 2022-23 मध्ये साडे पंधरा हजार शेतकरी सहभागी झाले होते.चालु वर्षी आज अखेर अवघे 13 हजार शेतकरी अद्यापपर्यत सहभागी झाले आहेत.

ससून रूग्णालयात 536 गुरूजींच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी होणारपैसे घेवून बनावट पदव्या देणारे ‘रॅकेट’

- Advertisment -

ताज्या बातम्या