Tuesday, January 6, 2026
HomeनगरAMC : एकेरी वाहतुकीसाठी महापालिकेचा प्रस्ताव

AMC : एकेरी वाहतुकीसाठी महापालिकेचा प्रस्ताव

नागरिकांना सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 17 डिसेंबरपर्यंत मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूचना, शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या सूचना यानुसार एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक ते कोर्ट मागील रस्ता ते झारेकर गल्ली कोपरा, शनिगल्ली ते कोर्टासमोरील बाजू (कोर्ट गल्ली) ते पटवर्धन चौक ते चितळे रस्ता, आनंदी बाजार चौक ते अमरधाम व शनिमारूती मंदिर (टांगे गल्ली) ते झारेकर गल्ली, अर्बन बँक चौक ते कापड बाजार मुंबई मिठाईवाला व मुंबई मिठाईवाला चौक ते शांती होजिअरी ते अर्बन बँक चौक, लोढा हाईटस ते नवीपेठ रस्ता ते शहर सहकारी बँक चौक व भिंगारवाला चौक ते कापड बाजार ते बॉम्बे बेकरी चौक, पंचपीर चावडी चौक ते आशा टॉकीज रस्ता व माणिक चौक ते मदहोशा पीर चौक, जुनी मनपा चौक ते वाडीया पार्क चौक व माळीवाडा वेस ते अप्सरा टॉकीज चौक ते पंचपोर चावडी चौक, कोठी चौक ते हातमपुरा चौक ते सुरेश गेम कॉर्नर व नालबंद खुंट ते धरती चौक ते बंगाल चौकी ते मुंजोबा स्वीट कॉर्नर चौक, रामचंद्र खुंट चौक ते मंगलगेट चौक ते पुणे हायवेपर्यंत व फलटण पोलीस चौकी चौक ते राजेंद्र हॉटेल चौक ते दाळमंडई चौक, तसेच फलटण पोलीस चौकी ते हुंडेकरी ऑफिस चौक ते नटराज चौक ते पुणे हायवे ते पुन्हा फलटण पोलीस चौकी अशा रस्त्यांवर एकेरी वाहतूक प्रस्तावित आहे.

YouTube video player

या एकेरी वाहतुकीबाबत नागरिकांच्या हरकती, सूचना किंवा आक्षेप असल्यास 17 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत शहर प्रभाग समिती कार्यालय (जुनी मनपा), झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय व मुख्य प्रशासकीय कार्यालयात दाखल कराव्यात, असे आवाहन डांगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...