Monday, May 6, 2024
Homeनगरकांदा काढणीसाठी मोजावे लागताय एकरी 12 हजार रुपये

कांदा काढणीसाठी मोजावे लागताय एकरी 12 हजार रुपये

काष्टी |वार्ताहर| Kashti

राज्य तसेच देशभरात कांद्याचे बाजार गडगडल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे, असे असताना कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसून मजुरांना एकरी 12 हजार रुपये दर द्यावा लागत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात आता कांदा काढणीस चांगलाच वेग आला असून कांदा काढणीचा मजुरीचा बाजारभाव गगणाला भिडला आहे.

- Advertisement -

काही शेतकर्‍यांनी रोजंदारीवर तर काही ठिकाणी बारा हजार रुपये एकर दराने कांदा काढणीस दिला आहे. यातच कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने कांदा शेती तोट्यात जाती की काय? अशी भीती वाटू लागली आहे.कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते.

परंतु यंदाचे बाजारभाव पाहता शेतकर्‍यांना कांदा पीक घेणे आतबट्ट्याचा खेळ ठरणार आहे. अशात मजुरीसाठी एकरी 12 हजार रुपये द्यावे लागत असल्याने शेतकर्‍याच्या हाती काहीच राहणार नाही. वाढता खर्च पाहता कांदा पीक परवडत नाही. दर वर्षी प्रमाणे यावर्षी कांदा लागवड कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या