Friday, November 22, 2024
Homeनाशिकभारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल

भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल

दर नियंत्रणासाठी केंद्राचे पाऊल,शेतकरी संतप्त

लासलगाव | हारुण शेख | Lasalgaon

कांद्यांचा (Onion) दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) परदेशातून कांदा आयात करण्याची परवानगी दिल्याने अफगाणिस्तानमधून (Afghanistan) पंजाब राज्यातील अमृतसर, जालिंदर या शहरांत ११ मालट्रक कांदा दाखल झाला आहे. कांद्याने भरलेल्या ५० ट्रक सीमेवर उभ्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत भारतात अफगाणिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या (Ministry of Commerce) ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला कांदा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, भुवनेश्वर या मेगा मेट्रो सिटीमध्ये ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे केंद्रे सुरू करत विक्री सुरू केली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ५ हजार रुपये किंटलचा पल्ला गाठत आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्याने आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली. पंजाब राज्यातील अमृतसर, जालिंदर या शहरांमध्ये ११ मालट्रकमधून ३०० टन कांदा दाखल झाला आहे. भारतीय सीमेवर ४५ ते ५० ट्रक उभे आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

कांदा आयात थांबवा

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून होत असलेल्या कांद्याची आयात थांबवावी, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. तसे न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

हे देखील वाचा :  Uddhav Thackeray : “बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन…”; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवलेला कांदा सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे सडत आहे. उत्पादन खर्चात २५ ते ३० रुपयांपर्यंत भर पडली आहे. आज कुठेतरी शेतकऱ्यांना किलोमागे पाच ते दहा रुपये नफा मिळत असताना परदेशातून कांदा आयात करणे चुकीचे आहे.

निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, शेतकरी बचत गट

केंद्र सरकारकडे असलेला कांद्याचा बफर स्टॉक नाफेड व एनसीसीएफकडून भाव नियंत्रित करण्यासाठी बाजारात उतरवला गेला. त्यानंतर आज केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात करून तो कांदा पंजाबात विक्रीस आणला आहे. भारतीय कांदा उत्पादकांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे.

प्रवीण कदम,कांदा निर्यातदार, लासलगाव

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या