Tuesday, December 3, 2024
HomeनगरOnion Rate : दिवाळी होताच कांद्याला 'अच्छे दिन'

Onion Rate : दिवाळी होताच कांद्याला ‘अच्छे दिन’

अहिल्यानगर । प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीचा धुराडा सुरू असतानाच दिवाळीच्या सणानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल ६,६०० रुपयांपर्यंत भाव नोंदवला गेला आहे.

दौंड-केडगाव आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या दोन्ही ठिकाणी १ नंबर उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल ६,६०० रुपयांचा भाव मिळाला. वांबोरीत ५५०० रुपये, अकोलेत ५३००, जुन्नर-आळेफाटा येथे ६०१०, शेवगावात १६५० ते ५८१५ रूपयांचा दर मिळाला.

सध्याच्या उच्च दरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळत आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत कांद्याच्या कमी दरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या वाढीव दरामुळे दिलासा मिळाला आहे.

सोमवारी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या बाजार समितीत एका दिवसात १०० क्विंटल स्थानिक कांद्याची आवक झाली. येथे किमान ३,००० रुपये, कमाल ६,५०० रुपये आणि सरासरी ५,५०० रुपये प्रति क्विंटल असा दर नोंदवला गेला. हा दर गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक दर मानला जात आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांद्याला चांगला प्रतिसाद मिळाला. येथे २,४७१ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. या बाजारपेठेत किमान १,००० रुपये, कमाल ६,३०० रुपये आणि सरासरी ३,००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६,७०१ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, येथे किमान २,००० रुपये, कमाल ५,५०० रुपये आणि सरासरी ३,७५० रुपये प्रति क्विंटल असा दर नोंदवला गेला.

लाल कांदा ७१०० रुपये

लाल कांद्याची आवक हळूहळू वाढत असून भावही तेजीत आहे. राज्यात काल कोल्हापुरात प्रति क्विंटल ७१०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. येथे ३०८५९ क्विंटल आवक झाली. दर ५०० ते ७१०० रूपयांचा भाव मिळाला. धुळ्यात १२०० ते ३६०० रूपये, लासलगावात २४५२ ते ४५११ तर सिन्नरमध्ये २००० ते ५६११ रूपयांचा दर मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या