Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रबार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

बार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

करोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.

- Advertisement -

त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या