Monday, November 25, 2024
Homeनाशिकपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

नाशिक | Nashik

व्यावसायिक शिक्षणातून (Professional Education) कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी जिल्ह्यातील (District) १३ तालुक्यांतील एकूण ६३ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे (Acharya Chanakya Skill Development Centres) सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील या ६३ महाविद्यालयांध्ये उद्या (दि.२०) रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेसाठी जिल्ह्यातील ‘या’ दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, लोकसभा व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य ऑनलाइन पद्धतीने व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात बागलाण (सटाणा) -२, चांदवड-४, देवळा-१, दिंडोरी-४, इगतपुरी-२, कळवण-२, मालेगाव-१२, नांदगाव-२, नाशिक-१९, निफाड-३, सिन्नर-५, त्र्यंबकेश्वार-६ व येवला-१ अशी एकूण ६३ आचार्य कौशल्य विकास केंद्रे तालुकानिहाय महाविद्यालयांमध्ये (Colleges) सुरू होत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Ganesh Visarjan 2024 : महापालिकेकडून दोन लाखांहून अधिक मूर्तींचे संकलन

दरम्यान, या केंद्रांमध्ये २०० ते ६०० तासांचे (साधारण: ३ महिने) National Skills Qualification Framework (NSQF) सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक च्या कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अधिकारी अख्तर तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या