Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेसाठी जिल्ह्यातील 'या' दोन...

Nashik News : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेसाठी जिल्ह्यातील ‘या’ दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर

नाशिक | Nashik

प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janashakti Party) प्रमुख तथा आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) हे काल नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) होते. या दौऱ्यात त्यांनी मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी जिल्ह्यातील १५ पैकी दोन मतदारसंघातील उमेदवार देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआच्या उमेदवारांचे टेन्शन चांगलेच वाढणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे काय? फायदे आणि आव्हाने कोणती? जाणून घ्या सविस्तर

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निफाड (Niphad) येथे घेण्यात आलेल्या कालच्या मेळाव्यात भाजप (BJP) ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे (Gurudev Kande) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

हे देखील वाचा : Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

त्यानंतर कडू यांनी निफाड विधानसभा मतदारसंघातून (Niphad Assembly Constituency) गुरुदेव कांदे यांना तर चांदवड विधानसभा मतदारसंघात ( Chandwad Assembly Constituency) प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता निवडणुकीच्या दरम्यान निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Ganesh Visarjan 2024 : महापालिकेकडून दोन लाखांहून अधिक मूर्तींचे संकलन

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची आमदार बच्चू कडू यांच्याकडून जोरदार जमवाजमव सुरू आहे. या तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य या पक्षांसह प्रहारचा समावेश असेल असे कडू यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही आघाडी राज्यभर कितपत प्रभावी ठरेल? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या