Friday, May 3, 2024
Homeनगरऑनलाईन बदलीनंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

ऑनलाईन बदलीनंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत स्पष्ट सुचना दिलेल्या आहे. 2020-21 च्या बिंदूनामावली प्रमाणे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. मात्र, या बिंदूनामावलीत जिल्ह्यात 170 शिक्षक हे अतिरिक्त ठरले असून अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांचे समायोजन हे शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. यंदा बदल्या होणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठी तारीख तारीख सुरू आहे. मागील आठवड्यात आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यास सुरूवात होणार होती. प्रत्यक्षातही प्रक्रिया सुरू होवू न शकल्याने आंतरजिल्हा शिक्षकांचा जीव टांगणला आहे. दुसरीकडे शिक्षकांच्या बदलीसाठी 2020-21 च्या बिंदूनामावली गृहीत धरण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी ती विभागीय आयुक्त पातळीवरून तपासून घेण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात बिंदूनामावली तपासल्यानंतर 170 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पहिली ते पाचवीपर्यंत 30 विद्यार्थ्यांच्या पटावर आणि सहा ते आठपर्यंत शाळेत 35 विद्यार्थ्यांच्या पट संख्येवर शिक्षकांची पदे निश्चिती होती. ही संख्या कमी झाल्यास संबंधीत शिक्षक आधी शाळेवर, त्यानंतर केंद्रात, तालुक्यात आणि जिल्हास्तरावर अतिरिक्त होतो. अशा प्रकारे जिल्ह्यात 170 शिक्षक अतिरिक्त झाले असून आता त्यांचे समायोजन शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेनंतर होणार आहे.

अतिरिक्त शिक्षक

श्रीगोंदा 13, शेवगाव 14, नगर 13, संगमनेर 15, कोपरगाव 3, पारनेर 8, अकोले 14, जामखेड 9, पाथर्डी 18, राहुरी 11, कर्जत 11, राहाता 15, श्रीरामपूर 7 आणि नेवासा 19 अशी अतिरिक्त शिक्षकांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या