Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 22 टक्के पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 22 टक्के पाणीसाठा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मान्सूनने जिल्ह्यात पूर्णता दडी मारल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. परिणामी जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठाही कमी होत आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही दिवसागणिक कमी होत चालला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 22 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तासगाव, नागासाक्या व माणिकपुंज ही धरणे पूर्णतः कोरडी पडली आहेत. तर गौतमी-गोदावरी धरणात अवघा सात टक्के, आळंदीत एक टक्का, वाघाडमध्ये सहा टक्के तर भावली धरणात सात टक्के असा अत्यल्प पाणीसाठा आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील विविध मोठे सात प्रकल्प व मध्यम सतरा प्रकल्प अशा एकूण 24 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 14 हजार 381 दशलक्ष घनफूट म्हणजेच 22 टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी तो आजपर्यंत 15 हजार 149 दशलक्ष घनफूट म्हणजेच 23 टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यात छोटे-मोठे प्रकल्प मिळून एकूण 24 प्रकल्प आहेत.यामध्ये गंगापूर धरण समूहात चार, पालखेड धरण समूहात 13 तर गिरणा खोरे धरण समूहात सात असे एकूण सात मोठे प्रकल्प व 17 मध्यम प्रकल्प असे एकूण 24 प्रकल्प आहेत.यापैकी गंगापूर धरण समूहामध्ये 21 टक्के इतका पाणीसाठा आहे. पालखेड धरण समूहामध्ये 13 टक्के पाणीसाठा आहे.गिरणा खोरे धरण समूहात 24 टक्के इतका पाणीसाठा आहे. एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 अशा 24 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची आकडेवारी पहाता ती यावर्षी आतापर्यंत 22 टक्के इतकी आहे.

प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे-दशलक्ष घनफुटामध्ये-गंगापूर (1750) 31 टक्के, कश्यपी (255) 14 टक्के,गौतमी गोदावरी (132) 7 टक्के, आळंदी (6) 1टक्के, पालखेड (224) 34 टक्के, करंजवण (709) 13 टक्के, वाघाड (148) 6 टक्के, ओझरखेड (532) 25 टक्के, पुणेगाव (72)12 टक्के, तिसगाव (00) 00 टक्के, दारणा (1153) 26 टक्के, भावली (94) 7 टक्के, मुकणे (2667) 37 टक्के, वालदेवी (217) 19 टक्के, कडवा (318) 2019 टक्के, नांदूरमध्यमेश्वर (253) 98 टक्के, भोजापूर (46) 13 टक्के, चणकापूर (669) 28 टक्के, हरणबारी (405) 35 टक्के, केळझर (188) 33 टक्के, नागासाक्या (0) 0 टक्के, गिरणा (4095) 22 टक्के, पुनद (448) 34 टक्के, माणिकपुंज(0) 0 टक्के. एकूण 14 हजार 381 दशलक्ष घनफूट 22 टक्के.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या