Saturday, May 18, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील १५ चित्रपटगृहांचा उघडला पडदा

जिल्ह्यातील १५ चित्रपटगृहांचा उघडला पडदा

जळगाव- jalgaon

शाळा,मंदिरांपाठोपाठ शासनाने (government) चित्रपट आणि नाट्यगृहे (Movies and theaters) सुरु (Started) करण्यासही मुभा दिली आहे. शासनाच्या नियमानुसार शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील १५ चित्रपटगृहाचा पडदा उघडला (cinema screen opened) आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यास नागरिकांचा अल्पप्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

सध्या चित्रपटगृहांना अल्पप्रमाणात प्रतिसाद असला तरी दिवाळीनंतर ५ नोव्हेंबर रोजी येणारा ‘सूर्यवंशी’ हा नवीन चित्रपट पडद्यावर येणार असून या चित्रपटाला गर्दी वाढेल,अशी माहिती जळगाव जिल्हा चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र लुंकड यांनी दिली.

पहिली लाट ओसरल्यानंतर १३ मार्च २०२० ला नाट्य व चित्रपटगृहे सुरु करण्यात आली होती. परंतु दुसरी लाट सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ती पुन्हा बंद करण्यात आली होती.आता शुक्र्रवारपासून दुसर्‍यांदा चित्रपटांची दालने खुली केली आहेत. सिनेमागृहाचे सॅनिटाझर करुन या आधीच तयारी पूर्ण केली होती. शुक्रवारी पहिल्याच दिवशी सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहण्यास येणार्‍या प्रेक्षकांना मास्क लावूनच प्रवेश देण्यात आला. तसेच चित्रपटगृहांच्या गेटवरच सॅनिटायझर, तापमान मोजणी यासह चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

शासनाच्या नियमानुसार सर्व सिनेमागृह ५० टक्के आसनक्षमतेतच सुरु करण्यात आली आहे.मात्र, पहिल्याच दिवशी प्रक्षेकांचा अल्पप्रतिसाद मिळाला असल्याचे रिगल टॉकीजचे मॅनेजर एस.एन.सोनार व चोपड्यातील आशा टॉकीजचे मॅनेजर संजय बजाज यांनी सांगितले. दरम्यान, मल्टिप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडद्यांवर दाखवले जातात. अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या