Friday, May 3, 2024
Homeराजकीयविरोधी पक्षनेते फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...

विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील वाढत्या रूग्ण संख्येबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की,

- Advertisement -

“करोना चाचण्या सातत्यानं नियंत्रित केल्या जात असल्यानं परिस्थिती विदारक होत चालली आहे. मुंबईत करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. देशातील सात राज्यांमध्येच कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत. त्यातील केवळ तीन राज्यांमध्ये 43 टक्के रुग्ण आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहेत. एकूण मृत्यू संख्येच्या 38 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहे. प्रत्येक दिवशी प्रतिदशलक्ष चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे सरासरीपेक्षाही राज्याचा संसर्गाचा दर अधिक आहे.” सोबतच त्यांनी ज्या राज्यांमध्ये प्रतिदशलक्ष चाचण्यांचा दर महाराष्ट्रा पेक्षा अधिक आहे, त्या राज्याची यादी देखील सोबत जोडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या