Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी', विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

‘फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई | Mumbai

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिवसागणिक सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष रंगताना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

‘फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या चौथा दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.

स्थगिती सरकार हाय हाय…विकासकामांना स्थगित देणाऱ्या धिक्कार असो. अशी घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करा अशी मागणी विरोधकांनी केली. फिफ्टी, फिफ्टी चलो गुवाहाटी अशी घोषणा त्यांनी बिस्कटचा पुडा दाखवत केली. या आंदोलना शिवसेना नेते अदित्य ठाकरेंचा देखील सहभाग होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या