Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात ओशो आश्रमात राडा! अनुयायांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

पुण्यात ओशो आश्रमात राडा! अनुयायांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

पुणे | Pune

पुण्यातील ओशो आश्रमात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यानं या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळं आंदोलन करणारे हे अनुयायी आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं.

- Advertisement -

काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.

RRR च्या ‘नाटू नाटू’ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे.

रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला खा. विखेंचा ‘दे धक्का’; सोशल मीडियावर होतंय कौतुक

आचार्य रजनीश (ओशो) यांच्या ७० व्या संबोधी दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्याने मंगळवारी काही अनुयायांनी आश्रमाच्या गेटबाहेर धरणं आंदोलन केलं. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (OIF) च्या विश्वस्त आणि व्यवस्थापन सदस्यांनी आश्रमाच्या जमिनीची तोडफोड करून ती अनधिकृतपणे विकण्याचा कट रचला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, त्यांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे असा आरोप केला.

ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अनुदान; काय आहेत अटी व शर्ती?

- Advertisment -

ताज्या बातम्या