Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशदेशात करोनाचा कहर सुरूच !

देशात करोनाचा कहर सुरूच !

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ९३ हजाराच्या वर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार २४७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ९३ हजार ३३७ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ४२ लाख ०८ हजार ४३२ रूग्ण करोनामुक्त झाले असून १० लाख १३ हजार ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ८५ हजार ६१९ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात ०८ लाखापेक्षा जास्त चाचण्या

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ६ कोटी २४ लाख ५४ हजार २५४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरुवारी ८ लाख ८१ हजार ९११ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या