पाचोरा – प्रतिनिधी – Pachora :
पाचोरा पोलीस स्टेशन मधील गु,र,न,३६८/२० भादवी कलम ४२०,३४ प्रमाणे आरोपी रमेश ईश्वर बागुल वय-५० रा.नगरदेवळा ता.पाचोरा येथील रहिवासी
असून तो हल्ली बिजापूर येथे सीआरपीसी मध्ये नोकरीस असून त्याने काही मुलांना आर्मी मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्या कडून लाखो रुपयांची फसवणूक करून आरोपी फरार होता.
पाचोरा पो.स्टे. गुन्हा दाखल झाल्या नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, मा.पो.अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे जळगाव अप्पर पो.अधीक्षक सचिन गोरे चाळीसगाव भाग उप.पो.अधिकारी ईश्वर कातकडे पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील पाचोरा पो.स्टे.निरीक्षक यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शना वरून पोलीस उप. निरीक्षक विकास पाटील तसेच पोलीस नाईक राहुल सोनवणे, पोलिस नाईक. विश्वास देशमुख, पो.कॉ.विनोद बेलदार, पो.कॉ.किरण पाटील तसेच ,
श्री.वारुळे यांच्या मदतीने आरोपीला नागपूर व नाशिक येथे राहतो व नावा शिवाय कुठल्याही प्रकारची माहिती नसतांना देखील आरोपीला नाशिक येथुन अटक करण्यात यश मिळविले पुढील तपास पीएसआय विकास पाटील करीत आहे.