Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यात भात कापणी अंतिम टप्यात

दिंडोरी तालुक्यात भात कापणी अंतिम टप्यात

ओझे । Oze

दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये भात सोंगणी अंतिम टप्यात असून परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात सुरुवाती पासून भात पिकाला पोषक वातावरण मिळत होते. त्यावेळी भात पिक जोरावर होते. परतू परतीच्या पावसाने नुकसान केल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात असून पुढील आठ ते दहा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दिंडोरीच्या पश्चिम भागांमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसाच्या पाण्यावर येथील शेतकरी भात पिकाचे उत्पादन घेत असतात. भात उत्पादकांच्या पंसती नुसार दप्तरी, भोगावती, लालकोर, महालक्ष्मी, कोळपी आदी स्वरूपाचे बियाणांना मागणी असते. तर इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणावर पंसती दिली जाते. कारण बाजारात या तांदळाला ग्राहक वर्गाकडून मोठी मागणी असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या