Monday, May 5, 2025
Home Blog Page 12

Women’s T20 World Cup 2026 : महिला टी 20 विश्वचषकाची तारीख जाहीर, इंग्लंडमध्ये थरार

0

महिला टी 20 विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच 2026 ची तारीख (Women’s T20 World Cup 2026) अखेर जाहीर झाली आहे. याबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करायची याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. परंतु अंतिम सामन्याबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती, परंतु आता आयसीसीनेही त्याची घोषणा केली आहे. आज गुरुवारी 1 मे रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या कार्यक्रमात ठिकाणे आणि तारखांची घोषणा करण्यात आली. चॅम्पियनशिपमध्ये 24 दिवसांत 33 सामने खेळवले जातील. पुढील वर्षी होणार्‍या महिला टी-20 वर्ल्ड कपचा (Women’s T20 World Cup 2026) अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे, असे आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे. त्याचे यजमानपद इंग्लंडकडे आहे.

विशेष म्हणजे, आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 जुलै रोजी लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, साउथहॅम्प्टनमधील हॅम्पशायर बाउल, लीड्समधील हेडिंग्ले, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल आणि ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंड आणि इतर ठिकाणी ही स्पर्धा होईल. ज्यामध्ये 12 संघ असतील. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी महिला टी-20 विश्वचषकात आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. इतर संघांची निवड पात्रता फेरीतून केली जाईल.

विशेष म्हणजे याआधी गेल्या तीन वेळा जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धेचा (ICC) अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला तेव्हा तेव्हा इंग्लंडचा संघ (England Team) चॅम्पियन बनला. 2017 मध्ये, महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला, त्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. 2019 मध्ये, जेव्हा पुरुषांच्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना येथे खेळला गेला, तेव्हाही इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणार्‍या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) इंग्लंडचा संघ पुन्हा विजेता बनेल का हे पाहणे खूप मनोरंजक असेल.

Nashik News : मृतदेह शोधासाठी काढल्या पाणवेली; रामकुंडात बीडचा तरूण बुडाला

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवदर्शनासाठी कुटुंबासह नाशिकच्या (Nashik) रामकुंड (Ramkund) येथे आलेल्या बीडमधील तरुणाचा आवर्तनाच्या प्रवाहित पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि. २९) रात्री घडली. दरम्यान, बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाने शोधमोहीम राबविली असता, बुडून बेपत्ता झालेल्या बालाजी रामभाऊ मुळे (वय २७, रा. राडी, ता. आंबेजोगई, जि. बीड) या तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजता केवड़ीबन भागा-तील नदीपात्रातील पाणवेलीत अडकल्याचे आढळून आले. या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गंगापूर धरणातून गोदावरी नदीसह (Godavari River) कालवे, शेती व एकलहरे पॉवर स्टेशनसाठी १० ते ११ मेपर्यंत अतिरिक्त एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग टप्याटप्प्याने सुरु आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तो प्रवाहित झाली आहे. दरम्यान, गोदापात्रात पाणवेली (Panveli) वाढल्या असून, प्रवाहित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून येत आहेत असे असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या बालाजी मुळे व कुटुंबाने मंगळवारी वणी आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

त्यानंतर ते सायंकाळी सात वाजता पंचवटीतील (Panchvati) रामकुंड भागात आले. रात्री साडेसात ते आठ वाजता गोदाआरती झाल्यावर कुटुंबाने पाण्यात दिवे सोडले. याचवेळी पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने बालाजी येथील बाणेश्वर मंदिराजवळील पात्रात घसरून पडला, पाणी प्रवाहित असल्याने तो बुडाला. यानंतर कुटुंबाने आरडाओरड केली. यंत्रणेने शोधाशोध केली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यातच, घटनेची माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी नाशिक येथील महेश शेळके यांना कळविली. महेश यांनी यंत्रणेशी समन्वय साधल्यावर शोधमोहिमेस वेग आला.

गोदावरी दुथडी वाहू लागली

गंगापूर धरणातून पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने सायंकाळी गोदाकाठी फिरणाऱ्यांनाही त्याचा आनंद मिळत आहे. धरणातून काही शेतीसाठी व काही एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाणी राखीव असत्ते. ते ठराविक वेळी सोडले जाते. ते राखीव एक हजार क्यूसेक पाणी काल सोडले गेल्याने गोदावरी वाहू लागली आहे. पाण्याअभावी येथे पाणवेली मोतथा प्रमाणात वाढल्या होत्या. आज त्या वाहत्या पाण्यामुळे वाहून गेल्या.

आता लोकांनाच उठाव करावा लागणार – जानी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले गेलेले नाही. नागील दहा वर्षापासून ‘बहा-बिस्कीट’ समिती विकासाचा देखावा करीत आहे. नदीला मूर्ख बनवले, जनतेला मूर्ख बनवले, केवळ कागदपत्र रंगवली. पाणवेळी नदीमात्रात तयार होताराच कशा? मनपाकडे स्कीगर नाही, रोबोटिक यंत्र आणले होते तेही दिसत नाहै, पानवेली काढणार कशा? आतापर्यंत लोकांच्या आरोग्याचा प्रश् निर्माण होत होता. आता पा पाणवेलींमुळे लोकांच्या जीवावर बेतायला लागले आहे. त्यामुळे आता लोकांनाच उठाव करावा लागणार आहे.

देवांग जानी, गोदावरीप्रेमी

पोहायला जाणे बेतले?

घटनेनंतर, बुधवारी सकाळी आठ वाजता अधिशमनच्या पंचवटी उपकेंद्र व शिंगाडा तलाव येथील प्रत्येकी एका बंबासह जवानांनी स्बरी बोटीतून वगळ टाकून बालाजी मुळेच्या गृतदेहाचा शोध घेतला. मात्र, अपयश येत असतानाच अत्रिशगन दलाला तपोवनालगतच्या केवडीबनातील उतारावरील नदीपात्रात असलेल्या पाणवेलीत बालाजीच मृतदेह आढळून आला. तेव्हा बालाजीच्या अंगावर अंतरवखाव्यतिरिक्त इत्तर कपड़े नव्हते. त्यामुळे तो नोहण्याच्या बेतात पाण्यात उतरला होता, व्यातून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे पोलीस व अग्रिशमन दलाने सांगितले. पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन संजय कानडे, संजय जाधव, बाळासाहेब महोगे, अशोक सरोदे यांनी गोदाकाठ गाठून शोधकार्य केले तसेच शिंगाडा तलाव मुख्यालयातूनही रबरी बोट घेऊन फायस्मन उदय शिर्के, नितीन म्हस्के, किशोर पाटील, संजय आगलावे आणि प्रशिक्षणार्थी जवान यांनी जुन्या कन्नमवार पुल ते तपोवनपर्यंत शोधगोहीम राबविली.

मनपाचे पाणवेलीकडे दुर्लक्ष

गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी वापरले जाणारे ट्रॅश स्किमर यंत्र पाच वर्षांनंतर स्मार्ट सिटीकडून महापालिकेला मिळाले आहे. मात्र, ते यंत्र सध्या काम करीत नसून त्याला ऑपरेटरच मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ट्रॅश स्किमर यंत्र खरेदी केले होते. कंपनीने पाच वर्षे ते चालविण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एका कंपनीवर सोपवली होती. मध्यंतरी हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेकडे हस्तांतरीत केले असून आधीच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. पाच वर्षे ते चालविणे आणि देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण दोन कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रॅश स्किमर यंत्राने आजवर गोदापात्र पूर्णपणे पाणवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे दुर्घटना देखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुद्दे

गाडगे महाराज पुलाखालील पात्रातून पाणवेली हटविल्या
दोन तासांत तब्बल एक ते दीड टन पाणवेली काढल्या
पुलाखालील रस्ता बॅरिकेडिंग करुन केला बंद
मृत वालाजी हा मेन्स पार्लरमध्ये काम करत होता
आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा झाला पोरका

Ladki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

0

मुंबई | Mumbai

अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार (30 एप्रिल) रोजी होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अक्षय्य तृतीयाचा (Akshaya Tritiya) सण ही झाला तरी पण एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही. याचदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Development Minister Aditi Tatkare) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना महायुतीची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असे त्यांनी सांगितले. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी? ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार काय? असे दिसते आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी, सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. लाडक्या बहिणीचे लक्ष एप्रिलचा हप्ताकडे लागले आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या संबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Nashik Crime : वर्ग तीनचे सेवक लाचखोरीत दोषी; चालू वर्षी सापळ्यामधील पाच जणांना शिक्षा

0

नाशिक | भारत पगारे | Nashik

सन २०१३ ते २०१८ या कालावधीत विविध लाचखोरी प्रकरणांतील (Bribe Case) एसीबी (ACB) सापळ्यात अडकलेल्या ‘वर्ग तीन’ मधील पाच लाचखोरांना न्यायालयाने (Court) जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत दोषी ठरवले आहे. आरोपींना दंडासह कारवासाची शिक्षा ठोठावली असून अन्य प्रकरणांचे खटले पटलावर आहेत. विशेष म्हणजे या लाचखोरीत नगरविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या महापालिकांमधील लोकसेवक आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दररोज राज्यभरात सातहून अधिक सापळे रचतो. त्यातील बहुतांश सापळे यशस्वी होतात. एसीबीच्या नाशिक, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या आठ परिक्षेत्रांतून सापळे व अपसंपदेबाबत कारवाया केल्या जातात. त्यानुसार, केलेल्या कारवायांत महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पाच लोकसेवक (Public Servant) व एक खासगी व्यक्तिस लाच स्विकारतांना पकडण्यात आले होते.

दोषसिद्धीसाठी सखोल तपासावर भर

लाचखोर तलाठी राठोडला एक लाख दहा हजार तर इतर आरोपींना दोन लाख २५ हजार असा तीन लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने दोषसिद्धी वाढवण्यासाठी सखोल तपास, साक्षीदार, तक्रारदारांचे जाबजबाब, मालमत्तेचे विवरण, आयओची भूमिका, सबळ पुराव्यांवर भर दिला जात आहे.

हे आहेत आरोपी

नागपूरमधील कुही तालुक्यातील मौजा तितूरचा तलाठी संजय नथ्थूजी राठोड (४७, रा. चंदशेषनगर, नागपूर) याला नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चार वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

मुंबई महापालिकेतील पर्यवेक्षी निरीक्षक संदीप शिवाजी नागरे याला न्यायाधिशांनी ५ मार्च २०२५ रोजी ३ वर्षे कैद व पन्नास हजारांचा दंड ठोठावला.

अशोक आनंदा रोकडे (प्रभारी मुकादम), नितीन दाजी जाधव (दुय्यम (दुय्यम अभियंता, मुंबई महापालिका) व खासगी व्यक्ती सज्जाद जब्बार खान यांना विशेष सत्र न्यायाधिशांनी प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांचा दंड २७ मार्च २०२५ रोजी ठोठावला.

लक्ष्मण धनू पवार या मुंबई महापालिकेतील भाडे पर्यवेक्षकास १६ एप्रिल २०२५ रोजी तीन वर्षे कारावास व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

दृष्टिक्षेप

चार दोषसिद्धी प्रकरणात सहा आरोपी
एक खासगी व्यक्ती व पाच सरकारी सेवक
शिक्षा मिळालेले सर्व आरोपी वर्ग तीनचे सेवक
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षा
वेळीच दोषारोपपत्रे, मालमत्ता तपास, साक्षीदारांमुळे शिक्षा

Accident News : कारची मोटारसायकलला धडक; पती पत्नी जखमी

0

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा-श्रीरामपूर राज्यमार्गावर (Newasa Shrirampur Highway) आज (1 मे) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पाचेगाव फाटा (Pachegav Phata) लगत असणार्‍या अजिंठा हॉटेलच्या समोर चार चाकी वाहनांने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक (Hit) दिली. त्यात मोटारसायकल वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना नेवासा फाटा (Newasa Phata) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, नागफणी ता. नेवासा येथील जयदीप कारभारी ठाणगे (वय 45) व त्यांची पत्नी मोहिनी जयदीप ठाणगे हे श्रीरामपूर येथील उंदिरगाव येथील आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी आटोपून घरी येत असताना लोखंडी फॉल जवळील अजिंठा हॉटेलच्या समोर त्यांच्या मोटारसायकलला श्रीरामपूरकडून (Shrirampur) नेवाश्याकडे जाणार्‍या एम एच 17-सी एक्स 4580 या चारचाकी वाहनांने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार पती व पत्नी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नेवासा फाटा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठाणगे यांच्या मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. चारचाकी गाडीवर महाराष्ट्र शासनाचा फलक लावलेला आहे. चारचाकी वाहन हे श्रीरामपूरच्या आसपासचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापर्यंत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) कोणत्याही प्रकारचा गुन्हा दखल झालेला नाही.

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना करा – मंत्री महाजन

0

नाशिक | Nashik

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी प्रशासनाला कामे पुरी करण्यासंदर्भात आदेश दिले.

यावेळी मंत्री महाजन म्हणाले की,”अलिकडेच प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडला. या कुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने गेले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आतापासूनच उपाययोजना कराव्यात. तसेच भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची कामे वेळेत होतील याची दक्षता घ्यावी”, असे म्हटले.

तसेच नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

दरम्यान, यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कोपरगावातील घडाळ्याच्या दुकानातील चोरी प्रकरणी बिहारची गँग जेरबंद

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कोपरगाव शहरातील घडाळ्याच्या दुकानातील चोरी प्रकरणी (Kopargav Watch Shop Theft) बिहार (Bihar) राज्यातील गँगला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) अटक केली असुन त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. यात सुरेंदर जयमंगल दास (वय 40), रियाज नईम अन्सारी (वय 40), पप्पु बिंदा गोस्वामी (वय 44), राजकुमार चंदन साह (वय 20), राजुकुमार बिरा प्रसाद (वय 45), नईम मुन्ना देवान (वय 30), राहुलकुमार किशोरी प्रसाद (वय 26), गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद (वय 25 सर्व रा. घोडासहन ता.घोडासहन जि.मोतीहारी, राज्य बिहार) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.

सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव शहरात सचिन वॉच कंपनी असे घडयाळाचे दुकान आहे. या दुकानात 18 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांना (Theft) दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळे चोरून नेले होते. याबाबत संजय लालचंद जैन (वय 61, रा.गुरूद्वारा रोड, कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असतांना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास याच्यासह त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते शिरूर (Shirur) जि.पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने शिरूर जि.पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र दास सह त्यांच्या साथिदारांना ताब्यात घेतले. या आरोपीकडील 9 लाख 81 हजार रूपयांचे टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीचे 10 घड्याळे, दोन वायफाय राऊटर, 7 मोबाईल असा एकुण 10 लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीकडे चौकशी केली असता सदर चोरीची कबुली दिली आहे.

सदरच्या गुन्हाचा तपास पोलीस अधिक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे आदींनी केला. ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

India vs Pakistan War : मोठी बातमी! BSF ने भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

0

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर (India Pakistan Border) प्रचंड तणाव बघायला मिळत आहे. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल असा पाकिस्तानकडून कांगावा केला जात आहे. अशातच आता भारत-पाकिस्तान सीमेवरील अमृतसर (Amrutsar) येथे दहशतवादी हल्ल्याचा (Terror Attack) मोठा कट उधळून लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळून लावला असून, शस्त्रारते आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे. बीएसएफ इंटेलिजेंस विंगने दिलेल्या माहितीच्या आधारे, बुधवारी संध्याकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना दोन हातबॉम्ब, तीन पिस्तूल, सहा मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

तसेच पुढील चौकशीसाठी जप्त केलेली रास्ते आणि स्फोटके स्थानिक पोलिसांकडे (Police) सोपवण्यात आली आहेत. समन्वय साधून करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची सर्तकता आणि तयारी दिसून आली. अत्यंत चपळाईने समन्वय साधून ही कारवाई करण्यात केली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली असून , कधी, कुठून कसा हल्ला होईल ही भिती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या सुरक्षा चिंतांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. या हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यांविरोधात सैन्य सतर्क आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती, यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे.

भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; ऑगस्टमध्ये धो धो पाऊस, अवकाळीचंही संकट

0

शेगाव – प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या प्रसिद्ध अशा घट मांडणीचे भाकीत आज वार गुरुवार रोजी दि.१ मे २०२५ रोजी पहाटे जाहीर करण्यात आली आहे. पिक पावसा संदर्भात भविष्यवाणीसाठी बुलढाणा येथील भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.

त्याचबरोबर इतरही गोष्टींवर भाकीत या भेंडवळच्या घट मांडणीतून केली जातात. यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस व अवकाळी पाऊस असेल.

  1. या वर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद मुंग, ज्वारी, तूर आदी पिकांचा समावेश आहे. तर शेतमालाला भाव मिळणार नाही, त्यामुळे मंदी सावट असेल. असा अंदाज भेंडवळच्या गट मांडणीमध्ये सारंगधर महाराज यांनी व्यक्त केला आहे.

आज १ मे २०२५ रोजी सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आलेत. भेंडवळची मांडणी ही ३५० वर्षांपासून ची स्थानिक परंपरा आहे. त्या परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजानंवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात.  यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल, राजा कायम असेल पण कायम तणावात असेल, यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल, परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे.

भारत – पाकिस्तानात युद्ध होणार?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यामुळे येत्या काळात युद्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर देखील भेंडवळच्या भविष्यवाणीत भाष्य करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही. मात्र, देशात तणावाचं वातावरण असेल. तसेच देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. तसेच परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली.

घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही परंतु ३५० वर्षांची परंपरा आहे!
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.

IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सशी भिडणार; MI उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करणार?

0

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians and Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. हा सामना जयपूर (Jaypur) येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या ५ सामन्यात १ विजय आणि ४ पराभवांसह गुणतालिकेत नववे स्थान निश्चित केले होते. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सलग ५ विजय संपादन करून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स मैदानावर उतरणार आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूध्द जयपूर येथे खेळविण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे सलग दुसरा विजय संपादन करून विजेतेपदाचा चौकार मारण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे.विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद रियान परागकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३० सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने १६ राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यात बाजी मारली आहे.तर १ सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर ८ सामने खेळविण्यात आले असून, राजस्थान रॉयल्सने ६ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.