नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हाही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये गेल्या आठवडाभरापासून यु्द्धाची तयारी सुरू आहे. पाकिस्तानने देशातंर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. सायरन बसवण्यात आले आहे. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पाक व्याप्तचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक याने याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सुरक्षेसाठी नीलम खोरे आणि नियंत्रण रेषेजवळ पर्यटनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पीओके हल्ल्याच्या भीतीने दहशतीत
भारत पीओके भागात केव्हाही हल्ला करु शकतो या भीतीने दहशतीत आहे. हल्ला झाल्यास जेवण, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी आपात्कालीन निधी तयार करण्यात आला आहे. जवळपा एक अब्ज रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊसचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या वास्तूंच्या मालकांकडून ते बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आपण सैन्यासाठी या वस्तू सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे.
मदरसे केले बंद
नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा