Sunday, April 12, 2026
Home Blog Page 13165

नगर : शहरात ख्रिसमस साजरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील विविध चर्चमध्ये ख्रीसमस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, संदेश देणे आदी कार्यक्रम घेण्यात आले.

शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त सुशोभीकरण करण्यात आले होते. विद्युत रोषणाईने चर्चच्या इमारती सजल्या होत्या. शहरात चांदणीच्या आकाराचे आकाशदिवे लावण्यात आले होते. मंगळवारी रात्री बारा वाजता नाताळ सुरू होताच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी आणि सकाळपासून चर्चमध्ये शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. विविध पक्षाच्या नेत्यांनी चर्चला भेटी देऊन ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या.

विविध चर्चमध्ये सकाळी प्रार्थना, धर्मगुरूंचे संदेश हे कार्यक्रम झाले. यासाठी ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांचा व महिलांचा समावेश मोठा होता. दिवसभर शहराच्या मध्यभागात, सावेडी उपनगरात नाताळ उत्साहात साजरा झाला.

नाशिक – पुणे ग्रीन कॉरिडोर; युवकाच्या यकृताचे पुण्यातील रूग्णास प्रत्यारोपण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथूने पुणे येथे विशेष ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून अवघ्या अडीच तासात यकृत पाठवण्यात आले. ते पुण्यातील रूग्णास प्रत्यारोपीत करण्यात येऊन त्यास जीवदान देण्यात यश आले. आदिवासी भागातील व्यक्तींनी अवदावदानाची ही पहिलीच घटना असून, तब्बल अडीच तासांत हे यकृत नाशिकवरुन पुण्यात पोहोचले.

भावशा सोनू महाले (३१, रा.दह्याने दिगर, ता.कळवण) असे यकृत दान करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवारी (दि.२३) रोजी काम संपल्यानंतर रात्री घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठिमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, अपघातात त्यांचा मेंदूमृत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यामुळे मंगळवारी (दि.२४) सायंकाळी भावशा यांना गंगापूर रोडवरील ऋषिकेश हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी भावशा महाले यांचे वडील (सोनू) व भाऊ (शिवाजी) यांच्याशी चर्चा करत अवयवदान करण्याची विनंती केली.

नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिल्यानंतर पुणे येथील ज्यूपिटर हॉस्पीटलला स्वादूपिंड व मूत्रपिंड, रुबी हॉल हॉस्पीटलसाठी यकृत देण्याचा निर्णय झाला. पुण्याहून खास डॉक्टरांची टीक नाशिकमध्ये दाखल झाली. सकाळी ११ वाजता या सर्व घडामोडी झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांची परवानगी मिळवत ग्रीन कॉरीडोर करण्यात आला. सायंकाळी ६ वाजेला रुग्णवाहिका ऋषिकेश हॉस्पीटलजवळून निघाली. वाहतूक पोलीसांच्या दोन गाड्यांचा ताफा या रुग्णवाहिकेसोबत देण्यात आला. गंगापूर रोडवरुन कॅनडा कॉर्नरमार्गे मायको सर्कल, मुंबई नाका व द्वारका मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

प्रेरणादाई निर्णय
सामन्य नागरीक तयार होत नसताना आदिवासी भागातील व्यक्तिंनी अवयवदान करणेअयवदान करण्याची ही पहिलीच घटना आहे. अवयवय दानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता असून, मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय महाले कुटुंबियांनी घेतला. ही समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.
-डॉ.भाऊसाहेब मोरे, संचालक (ऋषिकेश हॉस्पीटल)

Video: शिवरायांच्या 200 किल्ल्यांची सफर करणारा बेल्जियम ‘अवलिया’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

ऑफलाईन जीपीएस, पिठलं भाकरी सोबत मिळालं भरपुर प्रेम

नाशिक । प्रतिनिधी

भारतातील निसर्गसौंदर्यांची मोहिनी पडलेल्या बेल्जियममधील अवलीयाने अवघ्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोनशे किल्ले सर केल्याचा विक्रम केला. पीटर गेट असे या अवलियाचे नाव आहे. आज नाशिकमध्ये अनुभव कथनाचा कार्यक्रम सावरकर नगर येथील ठाकुर रेसिडेन्सिमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नाशिककरांची उपस्थिती होती.

यावेळी पीटरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्ंयांवरील अनुभव कथन केले. तसेच अनोळखी व्यक्ती निर्मनुष्य असलेल्या भागात कशाप्रकारे जाऊ शकते. त्याच्यापुढील काय आव्हाने असू शकतात. याबाबतही पीटरने मार्गदर्शन केले.

हिमालयातील खडतर भागात जाऊन नुकत्याच परतलेल्या पीटरने गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील 200 किल्ले सर केले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहेत. राजांच्या पराक्रमाची यशोगाथा समजून घेत आहेत. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि एवढ्या कमी मावळ्यांमध्ये उभारलेल्या किल्ल्यांची महती पीटरला भावते.

पीटरने उंच गडकिल्ले सर करण्यासाठी आपल्यासोबत कमी वजन असावे यासाठीची काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू घेऊन त्यांची भटकंती सुरू केली.

हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका असल्याचे ते बोलून दाखवतात.

हरीहर किल्यावर गेलो होतो, तिथे एका मातीच्या घरात मला पिठलं आणि भाकरी खायला मिळाली. खुप कमी वेळेत मला ते जेवण तेथील रहिवाशांनी दिले. त्यामूळे मला ते शिकण्याचा मोह झाला. मी भाकारी बनविणे तिथे शिकलो. त्या घरात माझे जेवण भारतातले आजवरचे सर्वांत छान आणि आठवणीत राहणारे जेवण असल्याचे पीटर म्हणाला.

महाराष्ट्राने प्रेम दिलं

मी मूळ धावपटू असल्याने फिटनेस आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे. एका दिवसात आठ किल्ले सर केले आहेत. परदेशातील व्यक्तीमहाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना फार कौतुक वाटतं. महाराष्ट्रात खुप चांगली माणसं आहेत. खुप प्रेम मला मिळालं.

पीटर गेट, अवलिया

ही काळजी घेतली

किल्ले अतिउंच आहेत त्यामूळे कमीत कमी सामान सोबतीला घेतले. यात अंगावर हलके आणि पातळ कपडे, स्लिपींग बॅग, सर्व गोष्टी धरुन तीन किलो वजन बाळगले.

यामुळे नाराजी

गडकिल्ले पाहूण प्रेरणा मिळते, पण रस्त्यात चिप्सचे पाकीटे, पाण्याच्या बाटल्या तसेच किल्ल्यांच्या भिंतिंवर लिहिलेलें आणि चित्रविचित्र आकृत्यांमूळे वाईट वाटलं. परंतू चिप्सच्या पाकीटांनी मला रस्ता असल्याचा मार्गही दाखवला.

जाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या बातम्या!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अ‍ॅक्सिस बँकेतील पोलिसांची खाती स्टेट बँकेत वळवणार ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – राज्यातील पोलिसांची वेतन खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याचं वृत्त आहे.

साधारण दोन लाख पोलीस कर्मचार्‍यांची वेतन खाती अ‍ॅक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.

त्यामुळे ठाकरे सरकारनं पोलिसांची खाती वळती करण्याचा निर्णय घेतल्यास अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केल्याच्या पर्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

फास्टॅगच्या मदतीने 46 कोटीची टोल वसूली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली- देशभरात टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग नावाची वाहनांसाठी इलेक्ट्रिक चीप आणली आहे. या चीपमुळे वेळेची बचत तसेच इंधनाची बचत होणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल सुरू केल्यानंतर आतापर्यंत तब्बल 1 कोटी 10 लाख फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. तसेच दररोज दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेला जनता स्वीकारत आहे, याचं हे उदाहरण असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

याचाच परिणाम टोल वसुलीवर झाला असून दररोज होणारी टोल वसूली 46 कोटी रूपयांवर पोहोचली असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

फास्टॅगद्वारे टोल वसूली सुरू केल्यानंतर फास्टॅगद्वारे टोल वसूली दररोज 24 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसेच याद्वारे टोल भरण्यामध्ये प्रवाशांना येणार्‍या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

पाणी बचतीसाठी आता ‘अटल भूजल योजना’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. तसेच त्यांनी शेतकरी, तरुणांना पाणी वाचवा असे आवाहन केले.

दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी अटल भूजल योजनेचा शुभारंभ केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांनी सदैव अटल स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

केंद्र सरकारने अलीकडेच अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी दिली आहे. पाच वर्षांच्या (2020-21 ते 2024-25) काळात सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या योजनेचा लाभ सुरूवातीला 6 राज्यांना होणार आहे. यात आठ हजार 350 ग्रामपंचायती आणि 78 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. देशातील मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

दिंडोरी : सावळघाट येथे मालवाहतूक ट्रक व आयशरचा भीषण अपघात; एक गंभीर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

गोळशी | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी व पेठ तालुक्याच्या हद्दी लगत अशोक लेलंड कंपनीची TN- 52-H-9178 व आयशर कंपनीची MH-15- EG-3941 याची आज पहाटे 4 च्या सुमारास सावळघाटात वळण रस्त्यावर अशोक लेलंड मालवाहतूक ट्रक चालकाचे उताराला असताना वाहना वरचे नियंत्रण सुडल्याने आयशर वर जाऊन जोरदार धडकल्याने आयशर चा चुराच झाला आहे

यात ट्रक ड्रायव्हर मुर्गन याला गंभीर मार लागल्याने याला तात्काळ सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिट इंचार्ज पजइ व पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आ. आदित्य ठाकरेंनाही झेड सुरक्षा

मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत सरकारने वाढ केली आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनाही झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या 45 व्यक्तीच्या सुरक्षेत राज्य सरकारने नुकतेच बदल केले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्था होती. त्यात वाढ करत आता त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या एक्स दर्जाच्या सुरक्षेतील सोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल काढून घेण्यात आला आहे. यापुढे सचिनला पोलिस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यापूर्वी वाय दर्जाच्या सुरक्षेसोबतच एस्कॉर्ट सुरक्षा देखील होती. आता खडसेंची एस्कर्ट सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा होती, आता ती ‘झेड’ असणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करुन ‘एक्स’ दर्जाची करण्यात आली आहे.

अ‍ॅड. निकम यांना आता ‘वाय’ सुरक्षा
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही सुरक्षेत घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा आता ‘वाय’ दर्जाची करण्यात आली आहे.

नगर: सावेडीत सहा लाखाचा ऐवज लंपास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चोरट्यांचा धुमाकूळ । दोन ठिकाणी घरफोड्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरात बंद घरांना टार्गेट करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील दोन घरफोड्यात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील प्रतिभा विजयकुमार पेंडसे यांच्या घरातून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 5 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रतिभा पेंडसे यांचा मुलगा पवन हे पुण्यात व्यावसायानिमित्त स्थायिक आहेत. 21 तारखेला त्यांचा वाढदिवस आसल्याने आई-वडील दोघेही पुण्यात गेले होते.

चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसरी घटना बालिकाश्रम रस्त्यावरील गीते हॉस्पिटल जवळच्या ऑरचीड आपर्टमेंटमध्ये घडली. दत्तात्रय चंद्रकांत अंदुरे यांच्या घरातून रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 28 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 17 ते 23 तारखेदरम्यान ही चोरी झाली. अंदुरे या वैद्यकीय व्यावसाय करतात. चोरट्यांनी कॅमेरा, रोकड आणि सोन्याचा ऐवज असा ऐवज लंपास केला.

केडगावातही चोर्‍या
केडगावातही चोेरट्यांनी ‘डाव’ साधत दोन ठिकाणी चोर्‍या केल्या. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांच्या भूषणनगरमधील घरातून 10 हजार रुपयांचे घड्याळ आणि अडीच हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. लिंकरोडवरील नाझरीन चर्चच्या पाठीमागे राहणार्‍या मार्विन चार्लल्स माकवान यांच्या घरातही चोरी झाली. काल रात्री चोरट्यांनी घरफोडी करत सहाशे रुपयांची रोकड लंपास केली.