Saturday, April 11, 2026
Home Blog Page 13285

श्रीरामपूरच्या युवकाची लोणीत गोळ्या झाडून हत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर, लोणीचे हल्लेखोर पसार

लोणी (वार्ताहर) – श्रीरामपूर येथील एका तरुणास लोणी येथील एका हॉटेलमध्ये आणून त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. यात श्रीरामपूर येथील तीन तर लोणी येथील चार आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर येथील सुभेदार वस्ती, बीफ मार्केटजवळ राहणारा फरदिन अबू कुरेशी (वय 18) याला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान बळजबरीने लोणीत आणून हॉटेल साई छत्रपती मध्ये त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. रविवारी रात्री 9 वाजता झालेल्या या घटनेत त्याचा मृत्यू झाला. श्रीरामपूर येथील तीन तर लोणीतील चार आरोपीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून घटनेमुळे लोणी परिसर मात्र हादरून गेला आहे.

मयत फरदिनची आई आशा अबू कुरेशी (रा.वॉर्ड नं.2 बीफ मार्केटजवळ, श्रीरामपूर) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख व शाहरुख शहा गाठण (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी बळजबरी करून व धमकी देऊन फरदिन याला नाशिकला जायचे म्हणून सोबत नेले व नंतर ते लोणीत आले. लोणीतील दाढ रस्त्यावरील हॉटेल साईछत्रपतीमध्ये त्यांना उमेश नागरे, अक्षय बनसोड, अरुण चौधरी व शुभम कदम(सर्व रा.लोणी) हे भेटले.आरोपींनी वाद निर्माण करून थेट फरदिन याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

दरम्यान, रविवारी रात्री 9 वाजता घडलेल्या या घटनेत फरदिन गंभीर जखमी झाला. हॉटेलमध्ये ग्राहकांची यावेळी गर्दी होती. बंदुकीच्या आवाजाने सर्वजण भयभीत झाले. आरोपींनी जखमी अवस्थेत फरदिनला प्रवरा रुग्णालयात नेले व तेथून ते पसार झाले. फरदिनचा मात्र यावेळी मृत्यू झाला. या घटनेने पोलिसही हादरले. लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.वरिष्ठ अधिकार्‍याना माहिती देण्यात आली. शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे पहाटेच घटनास्थळी आले.

अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी लोणीत आले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व आरोपी दिसून आले. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच आरोप जेरबंद होतील, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही. आरोपीमधील अनेकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने पोलीस याचा अनेक बाजूने तपास करीत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 359/19 प्रमाणे संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख व शाहरुख शहा गाठण, अक्षय बनसोड, अरुण चौधरी व शुभम कदम यांच्याविरुध्द भादंवि कलम 302,143,147,148,149,506,34 व आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोणीच्या शांततेला गालबोट!
लोणी हे गाव सहकार व शिक्षण या क्षेत्रात देशाच्या पातळीवर नावलौकिक मिळवलेले आहे. गावात गुन्हेगारीला कधीच थारा मिळालेला नाही. हजारो विद्यार्थी इथं शिक्षण घेत असल्याने सामाजिक सलोखा आणि शांतता इथली जमेची बाजू आहे. देश-विदेशातील नागरिक आपल्या मुला-मुलींना विश्वासाने इथे प्रवेश घेतात. लोणीचे ग्रामस्थ दररोजच्या घडामोडीवर लक्ष ठेऊन असतात. मात्र रविवारच्या घटनेने लोणीच्या शांततेला गालबोट लागले आहे.अवैध व्यवसाय आणि पोलिसांची कार्यक्षमता यामागे असल्याचे बोलले जाते. या घटनेतून वेळीच धडा घेतला नाही तर भविष्यातील धोक्याना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल हे मात्र नक्की.लोणीच्या शांततेला गालबोट लागले आहे.अवैध व्यवसाय आणि पोलिसांची कार्यक्षमता यामागे असल्याचे बोलले जाते. या घटनेतून वेळीच धडा घेतला नाही तर भविष्यातील धोक्याना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल हे मात्र नक्की.

पारोळा : शिरसमणी सरपंचपदी सौ.कल्पना पाटील यांची बिनविरोध निवड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पारोळा (श.प्र.) –

तालुक्यातील शिरसमणी येथील ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.कल्पना सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सौ.कल्पना पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. हि निवड दि.२ डिसेंबर रोजी ग्रा.पं.कार्यालयात आयोजीत सभेत करण्यात आली.

13 सदस्या पैकी 9 सदस्य हजर होते तर 4 सदस्य गैरहजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी पी. ए.पाटील यांनी कामकाज पहिले. तर ग्रामसेवक गणेश आल्हट निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी शेतकरी सहकारी संघाचे संचालक चेतन पाटील, मा.सरपंच कैलास नाना पाटील, मा.सरपंच सुदाम पाटील, मा.सरपंच बाळासाहेब पाटील, मा.सरपंच तुकाराम माळी, सदस्य भटुशेठ शिंपी, उपसरपंच दशरथ नाईक, सदस्य शाम वंजारी, सदस्य अंबादास सोनार, सदस्य गौतम पवार, छोटू पाटील, विट्ठल पाटील, शाम शिंपी, जगतराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्यांसाठी खुशखबर! SRPF साठी 828 जागांची भरती; इथे पाहा विभागवार जागा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे.  राज्य सरकारकडून पोलीस भरती केली जात आहे. यामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पदासाठी 828 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

आजचा सकाळी  पोलीस शिपाई चालक पदासाठी १०२९ जागांची भरती करण्यात येणार असल्याची जाहिरात प्रकाशित झाली होती. त्यानंतर लगेचच ही जाहिरात झळकल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

या विभागात पार पडेल भरती

राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा  २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख  २२ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी  http://bit.ly/34FzAcR

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

RTO acts against 29 rickshaws on first day

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The Regional Transport Office (RTO) took action against 200 auto-rickshaw drivers on the first day on Sunday for failing to charge fare as per meter. The squad inspected 200 auto rickshaws. Of them, penal action was taken against 29 auto-rickshaw driver, informed regional transport officer Bharat Kalaskar. City police and RTO have taken note indiscipline of auto-rickshaw drivers and excessive charge of fare. The police administration has insisted on that auto-rickshaw drivers should charge a fare as per meter.

Two squads were inspecting rickshaws though Sunday was a holiday. They found that 29 rickshaw drivers were carrying passengers out of the rule. They found that they were not charging fare as per meter and share method. The action was taken against such rickshaw drivers, informed deputy regional transport officer Vinay Ahire. This action will continue, he made it clear. Meanwhile, RTO has provided its guidance and appeal to rickshaw drivers near Nashik Road bus station.

उन्हाळ कांद्याची अकरा हजारी पार; शेतकऱ्यांमध्ये उत्साह

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कळवण : उन्हाळा कांदा बाजार भावाने कळवण बाजार समितीत मागील महिन्यात नऊ हजार रुपयांपर्यंत टप्पा गाठला. नंतर आज डिसेंबर च्या पहिल्याच दिवशी तब्बल दोन हजार रुपयांची वाढ होऊन कांदा अकरा हजार रुपये कांदा भाव झाल्याने शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला आहे.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात कांद्याचे बाजारभाव एक हजार ते ३००० रुपये तर सरासरी बाजारभाव २४०० रुपये होते सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभावात वाढच होत गेली. या महिन्यात ३०००ते ४०००रुपये बाजारभाव तर सरासरी ३२०० रुपये होते ऑक्टोंबर महिन्यात ४५०० रुपये तर सरासरी बाजारभाव ३८०० रुपये भाव होता नोहेंब र महिन्यात ९००० रुपये बाजारभाव तर सरासरी ४९०० रुपये भाव होता.

१ डिसेंबर रोजी कांदा मार्केट बंद होते आज २ डिसेंबर रोजी ११००० रुपये कांदा गेल्याने जिल्ह्यातील कांदा भावाचा हा उचांक असून सप्टेंबर पासून कांद्याच्या भावात वाढ झाली असल्याची माहिती कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, प्रमोद रौंदल यांनी दिली असून ११००० रुपये कांद्याला भाव झाल्याने शेतकरी वर्गात आनंद चे वातावरण असल्याचे वातावरण दिसत आहे. ‌

कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.

दि.०२/१२/२०१९ वार-सोमवार
कांदा बाजार भाव- सकाळसत्र
गावठी कांदा
कमीत कमी- ४०००
जास्तीत जास्त- ११०००
सरासरी – १०००० ते १०३००
ट्रॅक्टर- ११८
पीकअप – ११
एकूण- १२९ वाहनांचा लिलाव झाला.

शेतकरी वर्गा कडे कांदा मालं शिल्लक नसल्याने व कांदा आवक कमी असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली असून डिसेंरअखेर कांद्याच्या भावात वाढ किंवा घट देखील होऊ शकते.
-हेमंत बोरसे, कांदा व्यापारी.

उन्हाळा कांदा आवक या महिन्याअखेर संपणार असल्याची शक्यता असल्याने आता सर्व मदार लाल कांद्यावर अवलंबून असणार आहे.
-रवींद्र हिरे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण

बुलेट ट्रेनचे ओझं आमच्या अंगावर नको, लवकरच योग्य तो निर्णय; खा. संजय राऊत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

बुलेट ट्रेनच ओझं आमच्या डोक्यावर नको, ही आधीपासून आमची भूमिका राहिली आहे. आता तर आमचे सरकार विराजमान झाले आहे. महाआघाडीतील मित्रपक्ष असेलेल्या राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी खा. राऊत म्हणाले की, अनंतकुमार हेगडेंनी केलेल वक्तव्य गंभीर स्वरूपाचे असून भाजपने जनतेसोबत विश्वासघात केल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.

जर देवेंद्र फडणीवस यांनी हे केले असेल तर फडणवीस आणि पूर्ण भाजप जनतेचा गुन्हेगार आहे.  फडणवीसांनी हे नाकारलंय तर त्यांच्यावर विश्वास ठेवूया, तसं असेल तर भाजप खासदारांनी माफी मागावी.

मात्र यात काही तरी काळ बेरं आहे, राज्याशी बेईमानी झालीय का? तसे झाले असेल तर विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार फडणवीस आणि भाजपला नाही.

तसं झालं असेल राज्याच्या आकसापोटी झालंय असेच म्हणावे लागेल.  राज्याची आर्थिक स्थिती खूप गंभीर असून गेल्या 5 वर्षात राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे.

बुलेट ट्रेनच ओझं आमच्या डोक्यावर नको, ही आधीपासून आमची भूमिका राहिली असून राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका आहे. आता तर सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरे प्रमाणेच नाणार प्रकल्पासंदर्भातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कुणी मागणी करत असेल तर मुख्यमंत्री त्याचा विचार करतील.

खा. राऊत म्हणाले की,  शिवसेनेच्या वाटेवर अनेक प्रमुख लोक आहेत. पंकजा मुंडे यांचा निर्णय 12 डिसेंबरला कळेल.  मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, कोणतं खातं कुणाला, याचा निर्णय मुख्यमंत्रीचं घेणार असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले.

पोलीस भरती प्रक्रियेस आजपासून सुरवात! पण नाशिक ‘वंचित’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. आजपासून (दि.०२) पासून सुरु अर्ज प्रक्रियेस सुरवात होणार आहे.

दरम्यान नुकतेच गृहविभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया २ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार आहे. तसेच उमेदवारांना https://www.mahapariksha.gov.in या पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येणार आहे. तसेच https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/advPoliceII या संकेतस्थळावर आपल्याला जाहिरात पाहावयास मिळणार आहे.

या पदासाठी प्रथम लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात येणार आहे. यानंतर शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारिरीक चाचणीपूर्वी ड्रायविंग टेस्ट देणे बंधणकारक असणार आहे. लेखी परीक्षा आणि ड्रायविंग चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच शारिरीक चाचणीसाठी उमेदवार पात्र ठरणार आहेत. यानंतर कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. तिन्ही चाचण्यांच्या एकूण गुणसुचीवरून तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल.

पंकजाच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : वृत्तसंस्था  

राज्यातील सत्तेचा तिढा नुकताच सुटला. मात्र, काल(दि ०१) पंकजा मुंडे यांनी अपडेट केलेल्या फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंकाजाच नाही तर अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे विधान केल्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात बहुमत असूनही भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर भापला अजून एक मोठा धक्का बसणार असल्यामुळे  पंकजा मुंडेंचा 12 तारखेलाच कळेलही असेही ते म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राज्यातील सत्ता भाजपने गमावली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. त्या आता आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2626375727447972&id=147552098663693

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; चौघांनी पूर्ण केली ऑस्ट्रेलियातील खडतर ‘आयर्न मॅन’ स्पर्धा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा. नाशिकच्या चौघांनी काल (दि.०१) ऑस्ट्रेलियाच्या बसेल्टन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केली. अतिशय आव्हानात्मक वातावरणात १८ ते ९९ वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते.

नाशिक सायकलीस्टचे सदस्य किशोर घुमरे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले असे चौघा खेळाडूंचे नावे आहेत. किशोर घुमरे यांनी 15 तास 11 मिनिट आणि 22 सेकंदात, प्रशांत डबरी यांनी 16 तास 20 मिनिट 33 सेकंदात, महेंद्र छोरीया यांनी 16 तास 20 मिनिट आणि 41 सेकंदात, तर डॉ. अरुण गचाले यांनी 16 तास 56 मिनिट आणि 9 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेदरम्यान थंड पाण्यात जलतरण, प्रतिरोध करणाऱ्या वाऱ्याचा सामना सायकलिंग आणि रनिंग करावी लागते. डॉ. गचाले यांनी शेवटच्या क्षणी अतिशय वेगाने धावून ही स्पर्धा चार मिनिट आधी पूर्ण करत बाजी मारली.

किशोर घुमरे ,प्रशांत डबरी व  महेंद्र छोरीया यांनी मागील वर्षी कोल्हापूर येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली होती. तसेच डॉक्टर अरुण गचाले यांनी गोवा येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केली होती. याआधी नाशिकचे माजी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनीही या स्पर्धेत आपले नाव कोरले होते.

या स्पर्धेत विजयश्री प्राप्त करणाऱ्या तिघांना  डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटरचे डॉ. मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले. तर घुमरे हे नाशिक सायकलीस्टच्या ताफ्यात पंढरपूर वारीपासून दाखल झाले असून तेव्हापासून ते नियमित सराव करतात.

घुमरे नाशिकचे सर्वात तरुण असून अवघ्या ३४ व्या वर्षीच त्यांनी हा किताब आपल्या नावे केल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटर मध्ये सहा आयर्न मॅन निर्माण झाले असून अजून येणाऱ्या काळात चौघेजण या खडतर स्पर्धेची तयारी करत असल्याची माहिती डॉ. मुस्तफा यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.  या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस तर लागतोच शिवाय खडतर क्रीडाप्रकारामुळे शरीराच्या तंदुरुस्तीला अधिक महत्व दिले जाते.

स्पर्धेसाठी लागलेला वेळ

किशोर घुमरे : १५ : ११ : २२

प्रशांत डाबरी : १६ : २० : ३३
महेंद्र छोरीया : १६ : २० : ४१
डॉ. अरुण गचाले : १६ : २९ : ४२

नाशिकच्या वातावरणामुळे प्रभाव

नाशिकचे वातावरण खूप छान अल्हाददायक असल्यामुळे स्विमिंग, सायकलिंग ,रनिंग याचा सराव चांगल्या प्रकारे झाला. नाशिक मध्ये रनिंग ,सायकलींचे ग्रुप असल्यामुळे ग्रुप सोबत चांगल्याप्रकारे सराव नियमित होत होता. तसेच आपल्या आजूबाजूला धरणे असल्यामुळे ओपन वॉटर स्विमिंगचा सराव चांगला झाला असल्याची प्रतिक्रिया या खेळाडूंनी दिली.

असे असते स्पर्धेचे स्वरूप

या स्पर्धेत 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग,  42 किलोमीटर रनिंग असे असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी  तास दिले जातात.

केंद्राचे ४० हजार कोटी वाचविण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी

अवघ्या ८० तासांचे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांसाठी टीकेचे आयते कोलीत मिळालेल्या फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.  कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे.

‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भारप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्राने 40 हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे वाचवण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे नाट्य करण्यात आले होते.  नाव न घेता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.

आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. यानंतर त्याने राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेले असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, आपल्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असा प्रश्न नेहमीच विचारण्यात येतो आहे. त्यामुळे हेगडे यांच्या दाव्याने भाजपवरील रोष अधिकच वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

नियमित बातम्या थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी आमचे ‘टेलिग्राम चॅनल’ (Telegram) जॉईन करा