येत्या काही दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता!
गोवा:
मागील तीन ते चार दिवसांपासून अरबी समुद्रातील वातावरणात झालेल्या बदलांमध्ये नव्याने भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळी ढग पुन्हा एकत्र येऊन त्याचे आता कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होत होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील तीन चार दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे पुढे चक्रीवादळातही रूपांतर होऊ शकते. राज्यात २ ते ४ डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हिवाळ्यामध्ये वातावरण बदलाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. हवामान बदलाचा फटक्यामुळे घसा खवखवणे व कोरडी सर्दी होऊन आतल्या आत होणारे त्रास यामुळे ताप येणे वगैरे प्रकार सध्या होत आहेत. ग्रामीण भागात पहाटे थंड वातावरण व मध्यरात्रीपर्यंत थोडाफार उकाडा तर सायंकाळी असह्य उकाडा यातून आरोग्यावर परिणाम होत आहे.
बसमध्ये चढताना महिलेचे दागिणे चोरले
अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेने दुसर्या महिलेच्या पर्स मधील 48 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याची दागिणे चोरून नेले. ही घटना आज (रविवारी) चारच्या सुमारास सावेडी नाका बसस्थानकावर झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
निर्मला सोपान वाघ (वय- 55 रा. चितळी ता. श्रीरामपून हल्ली रा. शिवाजीनगर, पाईपलाईनरोड) या आज चारच्या सुमारास सावेडी बसस्थानक येथे नगर-सिन्नर बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना गर्दी होती. या गर्दीचा फायदा एका महिलेने उठवीला. वाघ यांच्या पर्समध्ये असलेले सोन्याची पोत, झुबे, ठुशी, अंगठी असे 48 हजार 500 रूपये किंमतीचे दागिणे लंपास केले. निर्मला वाघ यांच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढील प्रवास रद्द करून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
साडेनऊ लाखाचे सोयाबीन गायब ; ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या मार्केट यार्ड येथून धुळे येथे घेऊन जाण्यासाठी भरलेले 230 क्विंटल सोयाबीन ट्रक चालकाने गायब केले आहे. तब्बल साडेनऊ लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंदवा, मध्यप्रदेश) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केट यार्डमधील व्यापारी भगवानदास मुळचंद गुगळे (रा. कानडे मळा, सारसनगर) यांनी 23 नोब्हेबरला सायंकाळी पाच वाजता धुळे येथे पोहच करण्यासाठी ट्रकमध्ये (क्र एमपी- 09 एएच- 9919) नऊ लाख 51 हजार 717 रूपयांचे 230 क्विंटल सोयाबीन भरून दिले होते. ट्रक चालक मुकेश कुमारला हा माल धुळे येथील महाराष्ट्र ऑईल अॅट्रॅक्शन या कंपनीला पोहच करण्यास सांगितला होता. ट्रकचालक मार्केट यार्ड येथून सोयाबीन घेऊन निघाला परंतू ते धुळे येथे पोहच करण्याऐवजी त्याने परस्पर गायब केले. व्यापारी गुगळे यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मुकेश कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ हे करहत आहे.
नगर: पाईपलाईनरोडवर सोन्याचे दुकान फोडले; 65 हजारचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास
अहमदनगर (प्रतिनिधी) – पाईपलाईनरोडवर असलेले सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्याने 65 हजार 250 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर दत्तात्रय नांदुरकर (वय- 57 रा. दळवी मळा, पाईपलाईनरोड) यांचे पाईपलाईनरोडवर सागर हॉटेलसमोर सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 01) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेले 65 हजार 250 रूपये किंमतेचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. नांदुरकर यांच्या रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.
सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा; नाशिक ग्रामीण व मालेगाव मध्ये अंतिम सामना
नाशिक | प्रतिनिधी
किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत सिन्नर व येवला विरुद्ध दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरी गाठणाऱ्या त्र्यंबकचा, नाशिक ग्रामीणने अतिशय चुरशीच्या लढतीत 12 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. सिन्नर विरुद्ध रवी वाव्हळच्या घणाघाती नाबाद शतकामुळे १०९ त्र्यंबकने १४६ धावांनी मोठा विजय मिळवला तर विलास झोलेच्या ६ बळीमुळे येवला विरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला.
परंतु उपांत्य फेरीच्या लढतीत नाशिक ग्रामीण विरुद्ध अजय अनवटच्या ६७ धावांमुळे व रितेश शर्माच्या ४ बळीमुळे, रवी वाव्हळची नाबाद ६३ झुंज अपयशी ठरली व नाशिक ग्रामीण १२ धावांनी विजयी झाले. तर मालेगावने इगतपुरी विरुद्ध ८१ धावांनी मोठा विजय मिळविला व अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी होणार आहे.
जुना कांदा खातोय भाव; नवा कांदा ५०, जुना १२० रूपये किलो
नाशिक । कांद्याच्या दर गगनाला भिडले असून त्यांनी सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. बाजारपेठेत जुना कादा 120 रूपये किलोने विकला जात आहे. त्या तुलनेत नवा कांदा 50 रूपये किलो असल्याने तो खरेदीकडे ग्राहकांचा जादा कल आहे. किमान एक महिना कांद्याचे दर चढे राहणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी वर्तविला आहे. चढ्या दरामुळे शेतकर्याच्या हातात जरी चार जादा पैसे खुळखुळणार असले तरी, सामान्य जनतेला कांद्याने रडविले आहे.
शहरातील भाजी मंडई, पेठरोड, गोदाघाट आणि रविवार कारंजा येथील भाजीपाला विक्रेत्यांकडे जुन्या कांद्याला 100 ते 120 रूपये किलोदराने भाव मिळाला आहे. नवा कांदा मात्र 50 ते 60 रूपये किलो विक्री होत असून येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरातही घट आणि वाढ होत असून 20 रूपयांना मिळणारी कांद्याची पात 70 रूपयांना घ्यावी लागत आहे. मेथीदेखील 30 ते 40 रूपयांना मिळत आहे. एकीकडे कांद्याने डोळ्यात पांणी आणलेले असतांना दुसरीकडे भाजीपालाही भाव खात असल्याने सर्वसामान्य गृहिणींचे रोजचे बजेट कोलमडले आहे. बटाटे 25 रूपये किलो असून टमाट्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
असे आहेत भाज्यांचे दर
भाज्या भाव प्रति किलो
गवार १०० रूपये किलो
वांगे ८०
गिलके ६० ते ८०
दोडके ६० ते ८०
टमाटे २०
मिरची ६०
काकडी ४०
भेंडी ६०
वटाणा ५०
वाल ६०
भाजीपाल्याचे भाव स्थिर असून त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. जुना कांदा महाग झाला आहे. मागणी नेहमीप्रमाणे आहे.
-लोकेश शिरसाठ, भाजीविक्रेता
नगर-दौंड रस्त्यावर पेटलेली कार नेमकी कुणाची? पोलीस स्टेशनला खबरही नाही
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- नगर- दौंड रोडवर बेलवंडी फाटा येथे बर्णीग कारचा थरार, आज दि.1 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता दौंड कडून नगरकडे जाणार्या फोर्ड कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. मात्र लाख मोलाची कार जळली असताना याबाबात साधी खबर देखील बेलवंडी पोलिसात स्टेशनला दिली नसल्याने घटने बाबत संशय वाढला आहे.
नगर-दौंड रस्त्याचे काम झाले आहे. मात्र अनेक वेळा या रस्त्यावर अपघात घडत आहेत. अशा घटनाची खबर तातडीने संबधीत हद्दीतील पोलिसात दिली जाते. सदर घटना घडल्या नंतर कार मधील प्रवासी अथवा कारचा ड्रायव्हर यांच्यापैकी कोणीही पोलिसात तक्रार दाखल न करता निघून गेल्याने शंका उत्पन्न होत आहे. या घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या गाडीत नेमके किती जण होते आणि गाडी पेटल्यानंतर गाडी सोडून गेलेले व्यक्ती बाबत माहिती पोलीस स्टेशनला उपलब्ध नव्हती किंवा प्रत्यक्षदर्शीना देखील अधिक माहिती नव्हती.
नांदगाव : बांधून आभाळगाठी.. धान्याच्या शोधासाठी ‘तांडा’ चालला…
नांदगांव। संजय मोरे
नांदगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार आपल्या परिवारासह बैलगाड्या ,टँक्टर ,ट्रकमध्ये आपल्याला लागेल संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या चित्र सध्या खेड्यात दिसत आहे.ऊसतोड कामगारांना जगण्यासाठी ऊसतोडीच्या आधाराने मजुरांना कारखान्याकडे धावाधाव सुरु केली आहे. त्यामुळे अनेक खेडी ओसाड पडू लागल्याने विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा पावसाने तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाने भिजल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. नांदगाव तालुक्यात मका, कांदा, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील खेड्यामध्ये दमणगंगा व नारपार प्रकल्पाचे पाणी आले तर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटल्यावर ऊसतोडी कामगारांना कारखान्याचा आधार घेण्याची गरज भसणार नाही.
ऊसतोडीचा हंगाम सुरु झाल्याची संधी साधुन आपल्या कुटुंबासह जनावरांचाही व रोजीरोटीसाठीचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून ऊसतोड कामगार कारखान्याकडे सर्वांची धावधाव सुरु झाली आहे. आपल्या परिवारासह बैलगाड्या, टँक्टर व ट्रकमध्ये संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या तांड्याचे चित्र सध्या खेड्यात दिसत आहे. घरातील वयोवृद्ध व शाळेत जाणारी मुले घर सांभाळण्यासाठी गावात दिसत आहेत.
नगर, पुणे, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह थेट गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात टँक्टर, ट्रकने गावागावातील आपल्या परिवारासह व बैलगाड्यासह जथ्येच्या जथ्ये निघाले आहेत. बैलगांड्याच्या रांगाच रांगा रस्त्याने जातांना दिसत आहे. जवळपास ४० ते ५० टक्के लोक तालुक्यातील ग्रामीण भागातुन निघाल्याचा अंदाज नागरिकांच्या चर्चातुन समजते.
कांंदा व कापूस उत्पादकांची होणार कोंंडी
तालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊसतोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहे. रोजगारासाठी स्थलांतर असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी कोंंडी होत असते. सध्या कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतमुळे नांदगाव बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवणार आहे.
ऊसतोड कामगार ४ते ५ महिने पोटाची खळगी भरण्यासाठीआपल्या कुटुंबसह जातात. ऊसतोड मजुरांचे या गावाहून त्या गावाला मजुरांचे आठ ते पंधरा दिवसांत स्थलांतर होत असते. अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. ट्रक, टँक्टरने तालुक्यातील वाड्यावस्ती व रस्त्यावर हजर होतात.
चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला मारहाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणारे सुनील नारायण तांबे, निरज सुनील तांबे (रा. बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बाळासाहेब बोरूडे (वय- 28 रा. बोल्हेगाव ता. नगर) व रवी बाळासाहेब कराळे हे दोघे वायरमन शुक्रवारी (दि. 29) बोल्हेगाव परिसरात काम करत होते. साडेचारच्या सुमारास भारत बेकरीच्या पाठीमागे चोरून वीज वापरत असल्यांचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यावेळी बोरूडे व कराळे यांनी चोरीची वीज कट केली. वीज कट केल्यामुळे सुनील तांबे व निरज तांबे यांनी दोघा वायरमनला लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बोरूडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील तांबे व निरज तांबे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

