Monday, October 26, 2026
Homeनगरनगर: पाईपलाईनरोडवर सोन्याचे दुकान फोडले; 65 हजारचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास

नगर: पाईपलाईनरोडवर सोन्याचे दुकान फोडले; 65 हजारचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाईपलाईनरोडवर असलेले सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्याने 65 हजार 250 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर दत्तात्रय नांदुरकर (वय- 57 रा. दळवी मळा, पाईपलाईनरोड) यांचे पाईपलाईनरोडवर सागर हॉटेलसमोर सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 01) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेले 65 हजार 250 रूपये किंमतेचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. नांदुरकर यांच्या रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ ऑक्टोबर २०२६ – ग्राहकांच्या शोषणातून कंपन्यांची नफेखोरी

0
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे ही कोणत्याही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. बाजारपेठेतील स्पर्धा आणि नफ्याचे स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असले, तरी त्याचा वापर ग्राहकांच्या आर्थिक...