Saturday, June 13, 2026
Home Blog Page 13390

श्रीगोंदा : पेडगाव सेवा संस्थेत सव्वा दोन कोटीचा अपहार; सचिवासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल 

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव विविध सहकारी सेवा संस्थेत एका वर्षाच्या कालावधीत सव्वा दोन कोटींचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान या प्रकरणी द्वारकानाथ राजहंस यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे सचिव व कर्मचारी अशा दोघांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष हौसराव दळवी व ईश्वर पंढरीनाथ गोधडे अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नवे आहेत. फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे कि, वरील दोघेही कामावर असताना १ एप्रिल २०१८ ते १ मार्च २०१९ या एका वर्षाच्या कालावधीत त्यांच्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करूत संगनमत करून २ कोटी २३ लाख ४८ हजार सहाशे ९९ रुपयांचा अपहार केला आहे.

सव्वा दोन कोटींचा अपहार करून फौजदारी पात्र न्यास भंग करून संस्थेच्या सभासदांचा संचालकांचा, बँकेचा, संस्थेचा लेखापरीक्षकाचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याने  याबाबत सचिव व स्थानिक कर्मचारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

#जागतिक चहा दिवस : चहाप्रेमी नाशिककर आणि चहाचे वेगळेपण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रशांत निकाळे नाशिककर म्हटलं कि मिसळ बरोबर चहाचीही आठवण होते. चहाप्रेम इतकं कि घरात कोणी पाहुणा आला तर चहा घेणार का? असं आपणच विचारतोच. अनेकांची सकाळची सुरवातच या चहाबरोबर सुरु होते. यामुळे खऱ्या अर्थाने अनेक नाशिकरांचे जीवनही या चहाने व्यापले आहे. नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला चहाची टपरी दिसेल. त्यामुळे टपरीवरच्या कट्टिन्गला मात्र पर्याय नाही. ठिकठिकाणच्या ह्या चहाच्या टपऱ्या म्हणजे दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे टपरी.

त्यामुळे चहाप्रेमींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात चहाप्रेमी खुप आहेत. पण यामध्ये काहीजण प्रफुल्लित होण्यासाठी चहा पितात, तर काहींना विश्रांती घेण्यासाठी चहा लागतो, आणि काहींना स्वत:ला शांत करण्यासाठी, तर काही स्वत:ची झोप उडविण्यासाठी चहाचा उपयोग करतात. त्यामुळे चहा पिणारे नाशिककर जसे वेगवगेळ्या प्रकारचे आहेत तसेच या नाशकात चहाचेही विविध प्रकार पडतात.

नोगोरी टी :

नागोरी हे राजस्थान आणि गुजरातमधील मुस्लिम समुदायाचे लोक आहेत. ते परंपरागत दुग्ध व्यवसाय करीत असतात. त्यांनी बनवलेला चहा ‘नागोरी चाय’ म्हणून ओळखला जातो. या चहात दुधाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे इतर चहाच्या प्रकारांपेक्षा याची चव वेगळी असते. हा चहा तुलनेने घट्ट असतो.

इराणी चाय :

गेल्या शतकात मुंबईच्या बंदरात पर्शियन स्थलांतरितांनी प्रवेश केला आणि मुंबईहून ते पुण्यात आणि नंतर हैदराबादला आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यांच्याबरोबर इराणी चहाची संकल्पनाही भारतात आली. इराणी चहा आणि उर्वरीत चहाच्या बनविण्याच्या शैलीत फरक आहे. बंद असलेल्या भांड्यात चहाची पाने पाण्याबरोबर उकळतात. दुध देखील वेगळ्या भांड्यात उकळवले जाते आणि दुधाची साय हि वेगळी गोळा केली जाते. नंतर चहा देताना प्रथम दूध ओतले जाते नंतर काळा चहा हा त्यात टाकला जातो आणि त्यावर दुधाची साय टाकली जाते. तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही जा इराणी चहाची चव सारखी वाटेल.

मसाला चहा :

तुम्ही कोणत्याही कॉफीहाऊसमध्ये किंवा चहाच्या टपरीवर जा मसाला चहा हा तुम्हाला मिळेलच. आपल्याला अतिशय सोपा वाटणाऱ्या चहाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इंडियन स्पाईस टी अथार्त ‘मसालेदार चहा’ हा राजेरजवाडे आणि आयुर्वेदाच्या कथांमध्ये नेहमीच उल्लेखला आहे. आताच्या मसाला चहामध्ये असंख्य बदल झाले आहेत आणि आता तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.

तंदुरी चहा :

तंदुरी चहा हा भारतीय चहाचा एक वेगळाच प्रकार आहे. या रेसिपीमध्ये चहा नेहमीच्या भारतीय पद्धतीने तयार केला जातो. लहानगी मातीची भांडी (कुल्लड) तंदूरमध्ये गरम केली जातात आणि तयार चहा मातीच्या गरम भांड्यात ओतला जातो. या प्रक्रियेने गरम मातीच्या भांड्याचा स्वाद हा चहात येतो आणि एक वेगळीच चव देतो.

एकूणच नाशकात अनेक चहाचे प्रकार चाखायला मिळतात. त्यामुळे काही नाशिककरांनी या चहाची चव घेतली नसेल तर नक्की घ्या, कारण नाशिक हे चहाप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते.

मोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ रिचार्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । तुमच्या मोबाईल नंबरला सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागणार आहे. याआधी रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉलसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. आता मात्र रिचार्ज न केल्यास सात दिवसांनी ही सुविधा देखील बंद केली जाणार आहे. त्यामुळे एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना अनुक्रमे 23 व 24 रुपयांचे रिचार्ज करून आपला मोबाईल नंबर सुरु ठेवावा लागणार आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रिचार्जचे दर वाढवले आहेत. एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने आपल्याग्राहकांसाठी इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी लागणाऱे शुल्क आकारले जाणार नसल्याचं जाहीर केले. तर जिओने मात्र इतर नेटवर्कसाठी 6 पैसे प्रतिमिनिट दर आकारला आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी ऊटगोईंगसाठी शुल्क न आकारण्याची एक चांगली बातमी असली तरी दुसरी बातमी मात्र खिशाला कात्री लावणारी आहे. या टेलिकॉम कंपन्यांनीप्रीपेड प्लॅन महागडे केले असतानाही मिनिमम रिचार्ज पॉलिसी मात्र बंद केलेली नाही.

मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी एअरटेलने 23 तर व्होडाफोन-आयडियाने 24 रुपये कमीत कमी रिचार्ज करावा लागेल असे सांगत 20, 30 रुपयांचे टॉक टाइम प्लॅन रिलाँच केले आहेत.रिचार्जची मुदत संपल्यानंतर तुमचे आऊट गोइंग कॉल्स त्याच वेळी बंद होतात. तर 7 दिवसांच्या आत रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्स बंद होतील.

याआधी इनकमिंग कॉल्स येण्यासाठी रिचार्ज असणेआवश्यक नव्हते. आता एअरटेलचा मिनिमम प्लॅन 23 रुपयांचा तर आयडियाचा 24 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणताही डेटा, टॉक टाइम किंवा एसएमएस मिळत नाही. हे प्लॅन फक्त प्रीपेड अकाउंटची मुदत वाढवण्यासाठी आहेत. एअरटेलच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी तर व्होडाफोन-आयडियाने 14 दिवसांसाठी दिली आहे.

त्र्यंबकेश्वर : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी; ऑनलाइन खरेदीवर भर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

त्र्यंबकेश्वर : कडाक्याच्या थंडीमुळे त्र्यंबकेश्वर नगरीत पर्यटकांनी गर्दी केली असून विकेंडच्या सुट्ट्या घालवण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे पर्यटकांचा कल वाढत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींच्या संख्येतही वाढ झाली आहे. थोड्यात दिवसांत नाताळ येत असल्याने पुढील आठवड्यात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर भाविकांची गर्दी होत असते. यामुळे साहजिकच खरेदीचा उत्साहही अधिक दिऊन येतो. परंतु शहरात एटीएम ची संख्या कमी असल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन एटीएम असून या ठिकाणी कॅश नसल्याने पर्यटकांना खरेदीला पर्याय शोधावा लागत आहे. यामुळे बहुतेक पर्यटक ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना दिसत आहे.

त्यामुळे शहरात एटीएम असणे आवश्यक असून त्यामुळे पर्यटकांचा व्यवहार वाढून तो फायदा नगरपालिकेला होणार आहे. परिणामी थंडीत अधिक पर्यटक येत असल्याने तात्काळ बँक तसेच नगरपालिकेने याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड डिसेंबरअखेर?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले असून या सर्वांच्या नजरा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड कार्यक्रम केव्हा घोषित होतो याकडे लागले आहे.निवडणूक महिना अखेरला म्हणजेच 28 किंवा 29 डिसेंबरला लागण्याची शक्यता आहे. यासाठी 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून अजेंडा काढला जाणार असल्याची खात्रीदायक वृत्त आहे. त्यामुळे महिना अखेर जिल्हा परिषदेला नवीन अध्यक्ष-उपाध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकार्‍यांचा अडीच वर्षांची मुदत ही 21 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली.मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात पदाधिकार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतवाढीचा अध्यादेश 23 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता.

त्यामुळे या तारखेपासून पुढे 120 दिवसांचा कालावधी ग्राहय धरत ग्रामविकास विभागाने गेल्या आठवडयात नवीन आदेश काढत, विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली 120 दिवसांची मुदत ही 20 डिसेंबर रोजी संपत असल्याचे सांगत, नवीन पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया त्वरीत करणे अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच कार्यवाही करावी असे आदेश पत्रात म्हटले होते. परंतू, हे पत्रापाठोपाठ काही तासातच नव्याने पत्र ग्रामविकासकडून काढण्यात आले.

यात 20 डिसेंबररोजी वाढीव मुदत संपत असल्याने त्यानंतर ही प्रक्रीया राबविण्यात यावी असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 20 डिसेंबरनंतर हा कार्यक्रम जाहीर करावा असे सुचविले. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्य सरकराचे हिवाळी अधिवेशन असल्याने 20 डिसेंबर नंतर ही प्रक्रीया राबवावी असे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. या नवीन आदेशानुसार 20 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचा अजेंडा काढण्याची तयारी केली आहे. 20 डिसेंबरनंतर आठ दिवस गृहीत धरल्यास 28 किंवा 29 डिसेंबरला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक होण्याची शक्यताआहे.

आघाडी की नवीन समीकरण

राज्य शासनाचे दि.20 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुक घ्यावी,असे आदेश प्राप्त होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. त्यानंतर पुन्हा पत्र प्राप्त आलेे असले तरी या महिना अखेर ही निवडणुक प्रक्रीया होणारच असल्याने, इच्छुक तयारीला लागले आहेत.यातच, रिक्त तीन जागांसाठी असलेली निवडणुक प्रक्रीया ही पूर्ण झाली आहे. निवडणुक लागण्याची शक्यता लक्षात घेऊन, नेमके सत्तेचे कसे समीकरण येणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत एकाही पक्षांकडे बहुमत नसल्याने कोणत्याही दोन पक्षांना सत्तेसाठी एकत्र यावे, लागणार आहे. राज्यात सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली आहे. हीच महाआघाडी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कायम राहणार की नवीन समीकरण उदयास येणार याकडे आता लक्ष लागले आहे.

पक्षीय झालेले बलाबल
शिवसेना : 25
राष्ट्रवादी – 15
भाजप- 15
काँग्रेस – 8
माकप – 3
अपक्ष – 6
रिक्त -1

सैन्यदलाच्या परीक्षेत भोसलाचे 9 विद्यार्थी चमकले; एनडीए, सीडीएस परीक्षांचा निकाल जाहीर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील भोसला करियर अकादमी, भोसला मिलिटरी स्कूल व भोसला मिलिटरी कॉलेजचे 9 विद्यार्थी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाच्या एनडीए, सीडीएस आणि एएफसीएटी परीक्षांमध्ये चमकले आहे. हे 09 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून नुकताच या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.) परीक्षेत भोंसला मिलिटरी स्कूलमधून कार्तिक लथ, अथर्व बनसोडे, निमिष गरडे आणि लक्ष अग्रवाल व भोसला करिअर अकादमीमधून शुभम तावरे व हर्ष मिश्रा हे उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीला दिले आहे. संस्थेने नेहमीच त्यांना आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सशस्त्र सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

शुभम तावरे हा सध्या भोंसला मिलिटरी कॉलेज येथून तर हर्ष मिश्रा हा पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. चे शिक्षण घेत आहे. भोसला करिअर अकादमीच्या तीन पदवीधर विद्यार्थ्यांनीही या नोव्हेंबर महिन्यात एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) आणि कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (सीडीएसई) उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी शुभम कुमारसिंग यांनी पहिल्या प्रयत्नात एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) परीक्षा क्लिअर केली. भारतीय वायुसेनेतील अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी ही चाचणी आहे.

रणजित कोकाटे आणि प्रवीण शेवाळे भोसला करिअर अकादमीचे विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये आर्मीसाठी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन अनिरुद्ध तेलंग, भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, भोसला करिअर अकादमीचे विंग कमांडर अनिल सिंघा यांनी अभिनंदन केले आहे.

‘एमपीएससी’चा कारभार सहापैकी दोन सदस्यांच्या हाती; उर्वरित सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्थात एमपीएससी कारभार सहापैकी केवळ दोन सदस्यांवर सुरू असल्याने, ‘एमपीएससी’कडून होणार्‍या पदभरतीच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकारने तातडीने उर्वरित सदस्यांची नियुक्ती करून, प्रशासनाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पावल उचलावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार एकूण सहा सदस्य पाहतात. त्यापैकी प्रशासनात सध्या एक अध्यक्ष आणि सदस्य कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत एक अध्यक्ष व एक सदस्य असे दोन जण मिळून ‘एमपीएससी’चा कारभार पाहत असल्याने, प्रशासनाचा कारभार धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून, निवड प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’तील रिक्त पदांच्या ठिकाणी तत्काळ सदस्यांची नेमणूक करावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडंटस राइटस् संघटने’तर्फे करण्यात आली आहे.‘एमपीएससी’तर्फे 2017 सालामध्ये खात्यांतर्गत झालेली पोलिस उपनिरीक्षक परीक्षा; तसेच 2018 सालच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. तर, 2019 पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील मैदानी चाचणी व मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत.

या सोबतच 2019 अभियांत्रिकी सेवा, 2019 वनसेवा आणि 2019 राज्यसेवा परीक्षांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या परीक्षांद्वारे पदभरतीची प्रक्रिया संथ सुरू असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे तात्काळ रिक्त सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक महिने एमपीएससीचा कारभार हा प्रभारी अध्यक्षांच्या हाती होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर पूर्ण वेळ अध्यक्षांची नेमणूक झाली.

‘किऑस्क’ची बेशिस्त वाहनधारकांवर नजर; राजीव गांधी भवन येथे यंत्रणा कार्यान्वित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेसह बेशिस्त वाहनधारक आणि परिसरातील घटनांवर नजर ठेवणारी किऑक्स यंत्रणा शनिवार (दि.9) पासून राजीव गांधी भवन समोर कार्यन्वित करण्यात आली. खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. या यंत्रणेमुळे पोलीसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. शहरातील ही दुसरी किऑस्क यंत्रणा आहे.

राजीव गांधी भवनजवळ शनिवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल, सभागृहनेते सतिश सोनवणे, भाजप चे सभागृह गटनेते जगदीश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, कोडवेल किऑक्स कंपनीचे संस्थापक आनंद सुंदरराज आदी उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किऑक्स यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा शहरातील 13पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे.

9 सप्टेंबर 2019 पासून उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या ठिकाणच्या घटनांच्या दोषसिध्दतेसाठी या यंत्रणेतील हायटेक पुरावे कामी येणार आहेत. या यंत्रणेची वयोमर्यादा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. या मशिनच्या माध्यमातून पोलीस,रूग्णवाहिका तसेच अग्निशमन विभागाची तात्काळ मदत मिळविता येणार आहे. मशीनमध्ये पॅनिक बटण आणि कॅमेरा आहे. हे मशीन परिसरातील सर्व घटनांवर नजर ठेवणार आहे. मुलींसह महिलांनी मदतीसाठी मशीनचे पॅनिक बटन दाबताच त्याची सूचना पोलिसांसह संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. तसेच कॅमेर्‍यामुळे सिग्नलवरील सर्व चित्रिकरण होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करणे शक्य होणार आहे.

शिक्षणातून उद्याचे भवितव्य घडेल-लेफ्ट जन. शेकटकर; डॉ. मुंजे व्याख्यानमालेचा समारोप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

वर्तमान चांगला झाल्याशिवाय भविष्य घडणार नाही. शिक्षणातून उद्याचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी मेक इन इंडियासारखा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे, नाशिकसारखी महाराष्ट्रातील शहरे बौद्धिक संपदा असलेली आहेत. त्यासाठीच भोसलासारखी संस्था नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘मेक इन इंडिया’ सरंक्षण उत्पादन साहित्य केंद्र म्हणून नाशिकची संभाव्यता या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, प्रमुख पाहुणे प्रदीप पेशकार उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेचे शेवटचे म्हणजे तिसरे पुष्प गुंफले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला सैन्याची गरज नाही अशा मानसिकतेची मांडणी सुरुवातीच्या काळात झाली होती. त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेना उभी करून संघर्ष उभा केला. त्यामुळे केवळ सत्याग्रहाचे योगदान नसून क्रांतिकारकांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे.

विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण भारतीय सीमेलगत प्रतिकूल आहे. त्यामुळे भारतात सरंक्षण निर्माण झालेले तंत्रज्ञान जगाच्या कुठल्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. भारतातील 130 कोटी लोकसंख्या अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवते आहे. असे त्यांनी सांगितले. आपल्या जवळ असलेल्या संसाधनांचा उपयोग मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांसाठी करण्याची आवश्यकता आहे असे म्हणतांना त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अमेरिकन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर दिलेला भाषणाचा संदर्भ दिला. भारताकडे असलेली बौद्धिक संपदा हे आपले सामर्थ्य आहे. त्याचा उपयोग मेक इन इंडियासाठी होऊ शकतो. जगभरातील परिस्थितीचा विचार करता येणार्‍या काळात मेक इन इंडिया भारताला प्रगतीपथावर नेणारी ठरेल त्या दृष्टीने आपण सज्ज व्हायला हवे, सेही त्यांनी म्हटले.

पाहुण्यांचा परिचय स्नेहा कुलकर्णी यांनी केला. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत गीतातून केले.कार्यक्रमाचे आभार मुग्धा जोशी यांनी मानले. तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने रुपाली कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आणि संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

‘नाशिक’मेक इन इंडियासाठी योग्य

संरक्षण उत्पादनक्षेत्र मेक इन इंडीयासाठी नाशिकची भौगोलिक स्थिती योग्य आहे. नाशिक, अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद ही शहरे यासाठी पूरक असून नजीकच्या काळात हवाई वाहतूक चांगली झाली आहे. समुद्रमार्ग हा सुद्धा नाशिक शहरापासून अवघ्या दोनशे किमीवर आहे. येणार्‍या काळातील मोठ्या शहरांची वाढ दोनशे किमी परिघात होईल. त्या दृष्टीने नाशिक संरक्षण उत्पादनक्षेत्र यासाठी पूरक आहे.

मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पित्याचे निधन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील धनाजी संपत धेंडे (वय 46) यांनी नापिकी आणि सोसायटी कर्ज, खाजगी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याचा धक्का बसल्याने या शेतकर्‍यांचे वडील संपत नामदेव धेंडे (वय 62) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेडगाव येथील धनाजी धेंडे हे शेतात पारंपरिक पिके घेत होते. मात्र, नसर्गाच्या लहरीपणामुळे व शेतातून खर्चापेक्षा उत्पन्न कमी येत असल्याने यापूर्वी घेतलेले सोसायटी, बँक व खाजगी सावकारांच्या कर्ज असल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोटच्या मुलाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे वृध्द वडील संपत नामदेव धेंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला. धनाजी यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. मात्र, त्यांनी जीवनयात्रा संपवल्याने शोककळा पसरली. यात मुलगा आणि वडील या दोघांचा मृत्यू या कुटुंबासाठी धक्कादायक असल्याने गावावर शोककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसाने खरीप आणि रब्बी पिकांचे झालेले नुकसान. त्यातच बँक, सेवासंस्था वसुलीचा धाक यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्याने असे प्रसंग घडत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे.