Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानात इम्रान खान सरकारची विकेट; कोण होणार नवे पंतप्रधान?

पाकिस्तानात इम्रान खान सरकारची विकेट; कोण होणार नवे पंतप्रधान?

पाकिस्तानमध्ये (Pakistan Political Crisis) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपले आहे. पाकिस्तानातील पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारची साडेतीन वर्षांची इनिंग शनिवारी रात्री उशिरा संपुष्टात आली.

काल दिवसभर चाललेल्या हायव्होल्टेज ड्रामामध्ये शनिवारी राष्ट्रीय विधानसभेचे कामकाज अनेकवेळा तहकूब करण्यात आले. मतदानाचा कालावधी संपण्याच्या १५ मिनिटे आधी सभापती असद कैसर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (Imran Khan news)

- Advertisement -

मग नव्या सभापतींनी अविश्वासाच्या ठरावावर मतदान घेतले. यामध्ये इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे इम्रान खान यांच्या हातातील पाकिस्तानाची सत्ता गेली. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही.

इम्रान खान यांच्या गच्छंतीनंतर पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (Pakistan Muslim League-N) गटाचे अध्यक्ष शेहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

पाकिस्तानी संसदेत सध्या विरोधी पक्षनेते नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) आहेत. तीन वेळा पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

१९९७, २००८, २०१३ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. २०१८मध्ये सार्वत्रिक निवडणुकात पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. शाहबाज शरीफ यांचा परिवार मुळचा अमृतसरचा आहे.

१९८८ पासून पाकिस्तानी राजकारणात सक्रीय आहेत. २०२० मध्ये मनी लाँडरिंग केसमध्ये त्यांना अटक करण्यात आली. कोट्यवधींच्या अफरातफरीचे शाहबाज यांच्यावर आरोप आहेत. पण त्यांना एप्रिल २०२१ मध्ये लाहोर हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या