Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशImran Khan : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा, ५...

Imran Khan : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा, ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी!

दिल्ली । Delhi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान (Pakistan’s former PM) इम्रान खान (Imran Khan) यांना तीन वर्षांची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात (Toshakhana Case) सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना १ लाखांचा दंड आणि पुढील पाच वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

इम्रान खानवर यांच्यावर नेमके आरोप काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर २०१८ ते २०२२ या कालावधीत पदाचा गैरवापर करून सरकारी भेटवस्तू खरेदी-विक्रीसाठी आपल्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप आहे. या भेटवस्तू इम्रान खान यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान मिळाल्या होत्या. या सर्व वस्तुंची किंमत १४० दशलक्ष रुपये म्हणजेच ($६३५०००) पेक्षा जास्त होती. यानंतर, ट्रायल कोर्टाने सुनावणी घेतल्यानंतर इम्रान खानला मालमत्ता लपवणे आणि सरकारी भेटवस्तू विकल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र, इम्रान खानच्या वकिलांनी यापूर्वीच ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरवल तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या