Sunday, May 5, 2024
Homeजळगावपाल परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा; शेती पिकाचे मोठे नुकसान

पाल परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा; शेती पिकाचे मोठे नुकसान

पाल Pal ता.रावेर (वार्ताहर)- 

पालसह परिसरात शुक्रवारी 2 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal rain) झोडपून काढले. पावसाने विजेसह गडगडाटसह तीन तास पाऊस झाल्याने शेतकऱ्याची (farmer) त्रेधातिरपीट उडाली होती.   

- Advertisement -

धक्कादायक : अमळनेरमधुन दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले

परीसरात जोरात पाऊस होवून मका,तूर व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.तब्बल ३ तास झालेल्या पाऊसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.पाऊसाचे पाणी शेतामध्ये साचले होते.अनेक शेतकऱ्याचा मका जमिनदोस्त झाल्याने नुकसान झाले आहे.

पतीच्या अपघाती निधनाचा धक्का पत्नीने केली आत्महत्या

रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान झाले आहे.परीसरातील वीट भट्टा व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.अचानक पाऊस आल्याने तयार करण्यात आलेली वीट पाण्यात भिजून नुकसान झाले आहे.तीन तास पाऊस झाल्याने गावातील छोटे मोठे नाले तुडुंब वाहून निघाले.

VISUAL STORY : खान्देश कन्येची अधुरी कहानी लेकाचे आयुष्य झाले सुने सुने

यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना पाऊसापासून बचावाकरिता वन विभागाच्या निरीक्षण शेडचा आसरा घ्यावा लागला. तब्बल तीन तास दुचाकीधारक पाऊस थांबण्यासाठी वाट पाहत होते.येथील नंदकीशोर रघुनाथ चव्हाण यांचा  एक हेक्टरवरील मका जमिदोस्त झाला तर पार्वताबाई करणसिंग जाधव यांच्याही अडीच एकर वरील मका पाण्याने आडवा पडून नुकसान झाले आहे.आणखी काही शेतकऱ्यांचे देखील यामुळे नुकसान झाले आहे.

Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक…

- Advertisment -

ताज्या बातम्या