Thursday, May 9, 2024
Homeजळगावपल्लव साहेबनेे वर्सी महोत्साची सांगता

पल्लव साहेबनेे वर्सी महोत्साची सांगता

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा सिंधी बांधवांकडून (Sindhi brothers) साजरा केला जाणारा वर्सी महोत्सव (Varsi Festival) मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. तीन दिवस सुरु असलेल्या विविध धार्मीक (religious events) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी पल्लव साहेबने (Pallava Saheb) या महोत्सवाची सांगता (End of the festival) झाली. यावेळी भाविकांची मांदियाळी होती.

- Advertisement -

पूज्य श्री अमर शहीद संत कंवरराम साहब यांचा (65) वा, पूज्य सतगुरु श्री संत बाबा हरदासराम साहब यांचा (45) वा तर बाबा गेलाराम साहेब यांचा (14) वा वर्सी महोत्सव अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य कंवरनगर सिंधी पंचायत समिती यांच्याततर्फे आयोजीत करण्यात आला होता.

या महोत्सवाला देशभरातून भाविक दाखल झाले होते. शनिवारी रात्री अखंड पाठसाहब वाचन समाप्ती झाली. भोगसाहेबाला भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिली होती. यावेळी संत राजेशकुमार, देविदासभाई, उल्हासनगरचे साई बलरामसाहेब, साई गोपीराम साहेब, साई ईश्वरलाल, साई हरीराम, साई फकीरराम सुल्तानपुर (भोपाल), साई मोहनलाल-लखनऊ हे संत देशभरातून जळगावात दाखल झाले होते. या संतांच्या उपस्थितीत जळगावातील वर्सी महोत्सव मोठ्या चैतन्यमय वातावरणात साजरा झाला.

सांगता झाल्यानंतर देशभरातील

भाविक निघाले माघारी

दुपारी पल्लवसाहेबने वर्सी महोत्सवाची सांगता झाल्यानंतर देशभरातून आलेल्या भाविकांनी माघारी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी समाजबांधवांनी त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडून पुढच्या वर्षी होणार्‍या वर्सी महोत्सवात येण्याची विनंती यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या