Thursday, May 2, 2024
Homeनगरपंचायत सशक्तिकरण अभियानाच्या पुरस्कारांचे वितरण

पंचायत सशक्तिकरण अभियानाच्या पुरस्कारांचे वितरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ट दर्जा राखल्यामुळे पंचायत समिती राहाता कार्यालयाला 25 लाखांचा राष्ट्रीय पातळीवरील व ग्रामपंचायत लोणीला आमचा गाव आमचा विकास व चंद्रापूर ग्रामपंचायतीला सर्वसाधारण कामकाजाचा पुरस्कार व लोहगाव ग्रामपंचायतीला स्वच्छता विषय कामाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

शनिवारी हे पुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, पंचायत समिती राहाता तसेच गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, ग्रामपंचायत चंद्रापूर सरपंच प्राजक्ता घुले, ग्रामसेविका प्रतिभा पागीरे, ग्रामपंचायत लोहगाव सरपंच स्मिता चेचरे, ग्रामविकास अधिकारी रुक्मीणी सूर्यवंशी, ग्रामपंचायत लोणी बुद्रुक सरपंच कल्पना मैड, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर हे पुरस्कारार्थी उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्था मार्फत राबविल्या जातात. राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच विविध राबवलेले सामाजिक उपक्रम यामुळे राष्ट्रीय स्तरावर पंचायत समितीला पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा घुले व सभापती तांबे, उपसभापती जपे यांनी सांगितले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामासाठी उपलब्ध करून दिलेला.

तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन घरकूल योजना बायोगॅस विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमाबरोबर वेळेवर घेण्यात आलेल्या मासिक सभा सामाजिक बांधिलकीतून प्लास्टिक बंदी बेटी बचाव बेटी पढाओ अभियान आरोग्य विषयक कार्यशाळा पर्यावरण पूरक कार्यक्रम हागणदारीमुक्त तालुका आणि माहिती अधिकार कार्यशाळा याबरोबरच लेखापरिक्षणाची वेळोवेळी पूर्तता करण्यात सातत्य राखल्यामुळेच राहाता पंचायत समितीला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यात यश आले असल्याचे गटविकास अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.

लोणी, चंद्रापूर आणि लोहगाव या ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार आठ ते बारा लाखांचा दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 मिळाला आहे. हे पुरस्कार 2019-20 मधील केलेल्या कामगिरीसाठी मिळालेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या