अक्कलकुवा Akkalkuwa। प्रतिनिधी-
पंचायत राज समितीने(Panchayat Raj Samiti) अक्कलकुवा (Akkalkuwa) येथे भेट दिली असता तेथील ग्रामपंचायतीचे दप्तर चोरी (Gram Panchayat’s backpack stolen) झाल्याचे समितीला सांगण्यात आले. त्यामुळे समिती सदस्य (Committee members) अवाक(speechless) झाले. त्यांनी बंदोबस्ताला असणार्या पोलीस अधिकार्याकडून घटनेची सत्यता व तपासाची दिशा समजून घेतली. दप्तर चोरीमागे काही षडयंत्र तर नाही ना अशी शंका समितीने उपस्थित केली.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायत राज समितीने आज अक्कलकुवा तालुक्यात भेट देऊन सन 2017 ते 2021 या कालावधीतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. अक्कलकुवा तालुक्यात समितीचे गटप्रमुख आ.देवराव होळी, आ.अंबादास दानवे, आ.किशोर पाटील, आ.सदाशिव खोत यांनी भेट दिली. पंचायत राज समितीचा दौरा सकाळी 11 वाजेला नियोजित होता. मात्र, समितीच्या सदस्यांनी आधी तळोदा तालुक्याचा दौरा पुर्ण केला. त्यानंतर सुमारे 4 वाजेच्या सुमारास समितीच्या सदस्यांचे पंचायत समिती कार्यालयात आगमन झाले. याठिकाणी पारंपरिक ढोलच्या ठेक्यात पंचायत समितीच्या महिला कर्मचार्यांनी समितीच्या सदस्यांचे औक्षण करुन स्वागत केले. त्यानंतर पंचायत समितीच्या दिगंबरराव पाडवी सभागृहात आढावा बैठकीला सुरुवात झाली.
पंचायत समितीच्या कार्यालयात येण्यापुर्वी आ.देवराव होळी, आ.अंबादास दानवे, आ.किशोर पाटील यांनी अक्कलकुवा गृप ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन तपासणीसाठी तेथील दप्तरची मागणी केली. यावर ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर चोरी झाल्याचे सांगुन अक्कलकुवा पोलिसांत तक्रार केल्याचे सांगितले. दप्तर चोरीला गेल्याचे सांगितल्यानंतर समितीच्या सदस्य अवाक झाले त्यामुळे त्यांनी बंदोबस्ताला असणार्या एका पोलीस अधिकार्यांना बोलावुन घटनेची सत्यता व तपासाची दिशा समजुन घेतली व दप्तर चोरी मागे काही षडयंत्र तर नाही ना अशी शंका उपस्थित केली.त्यानंतर समितीचे सदस्य पंचायत समितीच्या बैठकीला आले. तेथे पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी सदस्यांचे स्वागत केले.त्यानंतर बंद दारा आड सन 2016 ते 2021 या वर्षातील विविध योजनांचा विकासाचा आढावा घेतला.
आढावा बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी सुमारे 6.30 वाजेच्या दरम्यान वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथे गट विकास अधिकारी रमेश देसले यांनी शाळेची माहिती दिली. यावेळी शाळेचे शिक्षक विलास पवार यांनी कोरोना काळात शाळा बंद असतांना वैविध्यपूर्ण पद्धतीने मुलांना शिक्षण दिल्याचे सांगितले. सदस्यांनी शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतूक करुन शाळेच्या इमारतीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील शाळेला नवीन वर्ग मिळाली नसल्याची नाराजी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांच्या निधीचा योग्य वापर करुन नवीन वर्ग खोल्या बांधणे शक्य असतांना अधिकार्यांनी त्याकडे लक्ष दिले नसल्याचे सांगितले.विविध योजनांचा उपयोग करुन शाळेची इमारत लवकरात लवकर बांधावी अशी सुचना केली. यावेळी समितीच्या सदस्यांसोबत कक्ष अधिकारी सुषमा लोंढे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) राजेंद्र पाटील, सहा.लेखा.अधिकारी अपूर्वा वाडकर उपस्थित होते. गट विकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, विस्तार अधिकारी अनिल बिर्हाडे, उप अभियंता एस.डी.पिंगळे यांनी समितीला माहिती दिली.