Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्र"लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे..."; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

“लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे…”; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरु होते. मात्र, त्यांनी आपले हे उपोषण महिनाभरासाठी स्थगित करत सरकारला १३ जुलै पर्यंतची मुदत दिली आहे.त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देताना ओबीसी समाजाला (OBC) धक्का लागणार नाही, याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.

हे देखील वाचा : “पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर..”; शरद पवारांचे CM शिंदेंना पत्र

आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून दोघांचीही प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्वीट करत आरक्षणाच्या भूमिकेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका मायबापाची असावी.सर्व वर्गांना आणि आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. त्यामुळे सरकारने हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे”, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारने उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; सिग्नलची वाट पाहत असलेल्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना हाके म्हणाले की, ” सरकार आणि सर्वच पक्षाचे प्रमुख नेते ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणत आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे आम्ही ओबीसी मराठा समाज घुसवला असे म्हणत आहेत.त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण असून ओबीसींना डावलल्याची भावना आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही? आणि आताच्या ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत त्या शासनाच्या संरक्षणामध्ये खाडाखोडी करून कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात आहेत. त्यामुळे ओबीसींना कसा धक्का लागत नाही हे सरकारने सांगून त्याचे लेखी उत्तर आम्हाला द्यावे”,असे त्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या