अमरावती | Amaravati
अमरावती जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा व्हिडिओ प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोशल मीडियावरुन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ काढल्याप्रकरणी पोलिसांनी अयान तन्वीर आणि आरोपी उझेर खान या विकृतांना अटक केली आहे. आरोपींनी हे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी फायद्यासाठी किंवा ‘क्रिमिनल अॅक्सेस’साठी केले नसून केवळ स्वत:च्या विकृत अय्याशीसाठी केले असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मित्र परिवारात फक्त विकृत अय्याशीसाठी आणि मर्द असल्याचे दाखवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अयानचे हे कृत्य लपून राहिले असते, मात्र जिवलग मित्रामुळे हे सगळे विकृत कांड जगापुढे आल्याची माहिती समोर आली आहे.
कोण जास्त मुलींना पटवणार यावरुन शर्यत लागली
परतवाडा व्हिडीओ कांडमधला आरोपी मुख्य आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यात कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार यावरून ‘शर्यत’ लागली होती. मुख्य आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता.
Nashik IT Case: पिडितांच्या गोपनियतेचा प्रश्न; न्यायालयाचा मोठा निर्णय, बंद दाराआड सुनावणी होणार
व्हिडिओ असे व्हायरल झाले
अयान आणि उजेर हे दोघे घनिष्ठ मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे बाहेर गेले असताना अयानने आपला मोबाईल उजेरकडे देऊन काही वेळासाठी बाहेर गेला. उजेरला अयानच्या मोबाईलचा पासवर्ड माहित होता. कुतूहलापोटी उजेरने मोबाईल उघडला आणि अयानच्या सोशल मीडिया अकाउंटमधील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओंचा साठा त्याच्या हाती लागला. उजेरने तत्काळ तो सर्व डेटा स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करुन घेतला. परंतू, काही दिवसांपूर्वी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात पैशावरून वादाची ठिणगी पडली आणि जोरदार भांडण झाले. पैशावरुन झालेल्या वादामुळे उझेर खान संतापला होता. त्यातूनच उझेरने अयानचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरूवात केली. तिथूनच हे परतवाडमधील मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले.
दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे ज्यामध्ये फ्लॅटमध्ये हे सर्व प्रकार करण्यात आला त्या तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे.





