Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजParliament Monsoon Session 2025 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 'या' तारखेपासून होणार सुरुवात

Parliament Monsoon Session 2025 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा

नवी दिल्ली | New Delhi

केंद्र सरकारने (Central Government) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Season) तारखांची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू होणार आहे. तर १२ ऑगस्ट २०२५ रोजी हे अधिवेशन संपणार आहे.

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने अधिवेशनाच्या तारखांची शिफारस केली आहे, असे रिजिजू यांनी सांगितल्याचे समोर आले आहे. याआधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Season) ३१ जानेवारी रोजी सुरू झाले होते. तर ४ एप्रिल २०२५ रोजी संपले होते.

YouTube video player

दरम्यान, विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा करण्यासाठी विशेष सत्र बोलावण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदीय नियमांनुसार पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व मुद्दे उपस्थित करता येतील, असे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

भरदिवसा भरवस्तीत चोरट्यांनी ‘धूमस्टाईल’ने साडेपाच तोळ्यांचे गंठण लांबवले

0
संगमनेर । प्रतिनिधी संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेशनगर परिसरात भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन ते...