Thursday, May 2, 2024
Homeनगरपारनेर कारागृहातील आरोपींजवळ मोबाईल

पारनेर कारागृहातील आरोपींजवळ मोबाईल

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर येथील कारागृहात गंभीर गुन्ह्यांत अटक असलेल्या सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कडिर्ले याचे अंगझडतीत 2 मोबाईल आढळून आले आहे. त्यामुळे आरोपींना जेवण, भत्ता देणारे मोबाईल पुरवणारा सुभाष लोंढे, प्रविण देशमुख (रा. सुपा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या कारागृह झडती दरम्यान प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

यासंबंधीची फिर्याद पो.कॉ आप्पासाहेब सोपान डमाळे यांनी दिली असून सरकारतर्फे फिर्यादी होवून फिर्याद लिहुन देतो की, मी पारनेर पोलीस स्टेशन येथे जुलैपासून नेमणुकीस असून सध्या दैनंदिन कर्तव्य बजावत असताना 24 मार्च ते सकाळी 8 वाजता ते दि. 25 मार्च रोजीचे सकाळी 8 वाजे पावेतो मला पारनेर दुय्यम कारागृह येथे सेट्री ड्युटी होती. त्यानुसार मी सकाळी 8 वाजता कर्तव्यावर हजर होवून पो.काँ. सुरज कदम यांच्याकडून चार्ज घेतला होता.

सदरवेळी दुय्यम कारागृहामध्ये 44 पुरुष आरोपी बंदिस्त होते. तर गार्ड अंमलदार म्हणून पो. ना. गुजर व पो. काँ. चौधुले व पो. काँ. साठे (नेमणूक सुपा पोलीस स्टेशन) यांना सेट्री म्हणून ड्युटी होती. दि 25 मार्च रोजी रात्री 1 वाजता सुमारास पो. काँ. साठे हे सेट्री ड्युटीकरीता पहार्‍यावर ड्युटी करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, दक्षिण जिल्हा रात्रगस्त दरम्यान पारनेर पोलीस स्टेशन येथे आलेले असून त्यांनी पारनेर दुय्यम कारागृहाची अचानक झडती घेणे आहे. त्याकरीता पोलीस निरीक्षक घनश्याम, बळप यांना कळवून तहसिलदार ज्योती देवरे यांना हजर राहण्याबाबत कळविले. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे पोलीस स्टेशनला हजर झाले.

त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील तहसिलदार श्रीमती देवरे, पोलीस निरीक्षक घनशाम बळप तसेच पोलीस ठाणे अंमलदार पो.हे.काँ. कडुस, गार्ड अंमलदार पो. ना. गुजर, सेट्रीकरीता हजर असलेले पो. काँ. साठे, पो.काँ. चौघुले तसेच मदतनीस पो.काँ. रोकडे, पो.काँ. दिवटे, पो.काँ. यादव, पोना मोढवे, पो.काँ. पाचारणे व मी अश्यांनी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास पारनेर दुयम कारागृहाची झडती घेतली असता बॅरक क्रमांक 4 मधील न्यायालयीन कोठडीमधील आरोपी सौरभ गणेश पोटघन (वय 23) याच्या अंगझडतीत एक निळ्या रंगाचा मोबाईल व आरोपी अविनाश निलेश कर्डीले (वय 23) याच्या अंगझडतीत एक पांढर्‍या रंगाचा सॅमसंग कंपनीचा बोबाईल मिळून आला आहे.

त्यांच्याकडे मोबाईल कोणी दिले व ते कधीपासून आहेत. याबाबत वरिष्ठांनी चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाइल हे त्यांना जेवण, भत्ता देणारे सुभाष लोंढे, वुडलँड हॉटेल, सुपा व प्रविण देशमुख यांनी पुरविल्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार सदरचे मोबाईल हे ताब्यात घेण्यात आलेले आहे. 25 मार्च रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास आरोपींविरुध्द कारागृह नियम सन 1894 चे कलम 42, 45 चे कलम 12 सह भा.द.वि कलम 34 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या