Friday, May 3, 2024
Homeनगरकुलकर्णी व खंडेलवाल यांच्या संशोधनाला पेटंट

कुलकर्णी व खंडेलवाल यांच्या संशोधनाला पेटंट

अहमदनगर | प्रतिनिधी

आय.एम.एसच्या (IMS) व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ.मीरा कुलकर्णी (Dr. Mira Kulkarni) व प्राध्यापक डॉ.राहुल खंडेलवाल (Dr. Rahul Khandelwal) यांना सर्व्हिस विभागांतर्गत मार्केटिंग इन हेल्थकेअर पास्ट अँड फ्युचर (Marketing in Healthcare Past and Future) या संशोधनासाठी भारत सरकारतर्फे (India Govt) पेटंट (Patent) प्रदान करण्यात आले.

- Advertisement -

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

कस्टमर एक्सपेरीयंस मॅनेजमेंटचा (Customer Experience Management) योग्य तो वापर करून अद्ययावत डेटा अल्गॉरिदमचा (Data algorithm) आरोग्य सेवेला (health care) वेग देण्यात मदत होणार आहे. संशोधनामध्ये सर्व्हिस मार्केटींग व कॉप्युटर टेकनॉलॉजीचा (Service Marketing and Computer Technology) वापर हेल्थकेअर सेक्टरमध्ये (Healthcare sector) करून आजच्या काळात त्याची उपयुक्तता कशी वाढवता येईल तसेच सी.ई.एम (CEM) म्हणजे कस्टमर एक्सपेरीयंस मॅनेजमेंटचा योग्य तो वापर करून ग्राहकांचा अनुभव सदर कामासाठी अधिक जलद गतीने कसा करता येईल, यावर या संशोधनात भर देण्यात आला आहे.

सदरच्या मॉडेलमध्ये संगणकाशी निगडीत डेटा वेअरहाउसिंग (Data warehousing), डेटा मायनिंग (data mining) आणि अल्गॉरीदमचा (algorithms) अतिशय नाविन्यपूर्णतेने वापर करण्यात आला आहे. यामध्ये कस्टमरची माहिती सेंट्रल सर्वरमध्ये स्टोअर करून ती महिती हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणाहून मिळविता येऊ शकते. या संशोधनामुळे पेशंट तसेच डॉक्टर्स यांना सर्व माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच पेशंटचा पूर्व इतिहास, झालेले उपचार, औषोधोपचार, डॉक्टरांनी केलेले निदान एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन मेडिकल सेवा देणे फार सुलभ व सोपे होईल.

तीन लाखांहून अधिक नगरकर करोनाच्या पहिल्या डोसपासून लांब

आय.एम.एस चे संचालक डॉ. एम.बी. मेहेता (IMS director Dr M B Mehta) यांच्या उपस्थितीत डॉ.मीरा कुलकर्णी व डॉ.राहुल खंडेलवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.उदय नगरकर, डॉ.विक्रम बार्नबस व सर्व सहकारी उपस्थित होते.तसेच बी.पी.एच.ई. सोसायटीचे (BPHE Society) सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आय.एम.एस नेहमीच संशोधनाला प्रोत्साहन देते. या संशोधनाचा अनेक ठिकाणी वापर करता येऊ शकतो. तसेच येत्या काळात सेवा क्ष्रेत्राला वाढता प्रतिसाद पाहता संस्थेला अशा नवनवीन संशोधनाचा फायदा होईल.

– डॉ. मीरा कुलकर्णी, डॉ. राहुल खंडेलवाल

- Advertisment -

ताज्या बातम्या