Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमपाथर्डीत मध्यरात्री घरफोडी; शेतकर्‍याला मारहाण

पाथर्डीत मध्यरात्री घरफोडी; शेतकर्‍याला मारहाण

सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास || गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील मालेवाडी येथे मंगळवारी (दि.8) मध्यरात्री घडलेल्या थरारक घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तोंडाला कापड बांधलेल्या तिघा अज्ञात दरोडेखोरांनी घरात शिरून शेतकरी रामहरी दराडे (वय 39) यांना मारहाण करत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

रामहरी दराडे हे शेती आणि फिटरचे काम करून उदरनिर्वाह करतात. सध्या ते पत्नी मंगल यांच्यासोबत मालेवाडीत राहतात. त्यांची मुले शिक्षणासाठी गावाबाहेर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.7) रात्री 10 वाजता दराडे दाम्पत्य झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री (दि.8 ) 1.30 च्या सुमारास पत्नी मंगल हिने आरडाओरडा केल्याने रामहरी दराडे जागे झाले. तोंडाला कापड बांधलेले तीन अनोळखी इसम हातात लाकडी काठी व लोखंडी शस्त्रे घेऊन घरात घुसले होते. त्यापैकी एकाने दराडे यांच्या पायावर काठीने मारहाण केली, तर दुसर्‍याने कपाळावर घाव घातला.

YouTube video player

पत्नी मंगल हिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी बोटांनी इशारा करत तिला गप्प बसवले. दरोडेखोरांपैकी एकाने लाल रंगाचा कपडा, तर इतर दोघांनी काळा व पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. हल्ल्यानंतर दाम्पत्याने घराची पाहणी केली असता लाकडी सोफ्याच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे दिसले. कपाटातून 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या व मणी, मुलांचे चांदीचे 5 भाराचे ब्रेसलेट आणि 19 हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तोंड झाकलेले आरोपी कैद झाले असून, त्यांच्या हातात धारदार शस्त्रे दिसून आली आहेत. घटनास्थळी एक लांब कोयता आढळून आला असून, ही घटना पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पाथर्डी पोलीसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे मालेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...