Sunday, May 19, 2024
Homeनगरपाथर्डी शहरात दरोडा; एकाचा खून करून लूट

पाथर्डी शहरात दरोडा; एकाचा खून करून लूट

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहराच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारी (दि.22) मध्यरात्री रंगार गल्लीत दरोडा (Robbery) पडला. घरात झोपलेल्या संजय रामचंद्र गुरसाळी यांचा धारदार शस्त्राने खून (Murder) करुन अज्ञात दरोडेखोरांनी (Robber) सोळा तोळे सोन्याचे दागीने (Gold Jewelry) घेवुन पोबारा केला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी दरोडा व खुनाचा गु्न्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

- Advertisement -

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर; 6 कोटींचा निधी, उत्पादकांना लाभ होणार

संजय गुरसाळी (रा. रंगारी गल्ली, पाथर्डी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष होते. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शहरातील संजय गुरसाळी हे रंगार गल्ली येथे अन्य दोन भावासोबत राहत होते. सोमवारी रात्री घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुममधे गुरसाळी एकटेच झोपलेले होते. सकाळी 6 वाजता झोपेतुन उठल्यानंतर त्यांची भाऊजयी यांच्या नजरेत आले की घरात चोरी (Theft) झाली आहे.

कर्ज फेडण्यासाठी मित्रांनीच दिली लुटीची सुपारी

कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी घरातील इतरांना झोपेतुन उठविले. संजय गुरसाळी वरच्या मजल्यावर झोपलेले दिसले.त्यांना पत्नी गिरीजा यांनी उठविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर घरातील इतर सर्वजण जमा झाले. पोलिसांना माहीती समजात पोलिसही (Police) घटनास्थळी आले. संजय रामचंद्र गुरसाळी यांना दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यु (Death) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेची माहीती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधिक्षक अजित पाटील, अरुण पाटील, शिरीष वमने, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठसेतज्ञ व श्वानपथक बोलविण्यात आले होते.

मढी मंदिरातून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

श्वानाने गुरसाळी यांच्या घरापासुन मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला. मात्र तेथुन चोरट्यांनी वाहनाचा वापर केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय यांचे भाऊ राजेंद्र रामचंद्र गुरसाळी यांनी घटनेबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दरोडा (Robbery) व खुनाचा गुन्हा दाखल (Murder Filed a Case) झाला आहे.

शहरातील चोरीच्या घटनेत निष्पाप संजय गुरसाळी यांचा दुर्देवी बळी गेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, पाथर्डी पोलिस अधिकारी संतोष मुटकुळे यांचे तीन पथके घटनेचा तपास करीत आहेत. गुन्ह्याबाबात तांत्रीक माहीती जमा केली आहे. लवकरच पोलिस आरोपींच्या जवळ पोहचत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल .

– राकेश ओला,जिल्हा पोलिस अधिक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या