Tuesday, February 24, 2026
Homeदेश विदेशअंदमान-निकोबार बेटावर मोठी दुर्घटना; उड्डाणाच्या काही वेळातच पवन हंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं

अंदमान-निकोबार बेटावर मोठी दुर्घटना; उड्डाणाच्या काही वेळातच पवन हंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रांची येथे मोठी विमान दुर्घटना घडलेली असतानाच अंदमान-निकोबार बेटांवर मोठी दुर्घटना घडली आहे. उड्डाणानंतर काही वेळातच पवन हंस हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान सुमद्रात कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये किमान ७ जण होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

घटनेची माहिती मिळताच, बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी कर्मचारी आणि प्रवाशांना बाहेर काढले. हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जात होते. उड्डाणानंतरच पायलटला तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली. त्यामुळे, त्याच्याकडे समुद्रात क्रॅश-लँडिंग करण्याचा पर्याय होता.

- Advertisement -

“फोन आला की त्वरित पोलिसांना कळवा” — डिजिटल अरेस्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली महत्वाची भूमिका

YouTube video player

ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरने पोर्ट ब्लेअरहून दोन क्रू मेंबर्स आणि पाच प्रवाशांसह उड्डाण केले. परिस्थिती लक्षात घेता, सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकाने हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला. मायाबंदरमध्ये लँडिंग करताना हेलिकॉप्टर धावपट्टीपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर समुद्रात उतरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीच्या आधारे, तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पवन हंस ही देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची हेलिकॉप्टर कंपनी आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरचा वापर दुर्गम भागात प्रवास करण्यासाठी केला जातो. अगदी प्रमुख राजकारणी देखील पवन हंसच्या सेवा वापरतात. ही कंपनी १९८५ मध्ये स्थापन झाली. देशभरातील दुर्गम भागांना जोडणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलिसांना चोरांचे आव्हान; एकाच दिवसात सहा दुचाकी वाहने...

0
नाशिक | Nashik शहरात दुचाकी चोरट्यांनी (Bike Thieves) धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा दुचाकी वाहने चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी...