Monday, June 15, 2026
Homeक्राईमNashik Crime : पोलिसांना चोरांचे आव्हान; एकाच दिवसात सहा दुचाकी वाहने लंपास

Nashik Crime : पोलिसांना चोरांचे आव्हान; एकाच दिवसात सहा दुचाकी वाहने लंपास

नाशिक | Nashik

शहरात दुचाकी चोरट्यांनी (Bike Thieves) धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा दुचाकी वाहने चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी आता केवळ गर्दीची ठिकाणेच नव्हे, तर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शिरूनही हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या घटनांमुळे नाशिककर वाहनधारकांमध्ये भीतीचे आणि वातावरण आहे.

- Advertisement -

दुचाकी चोरीच्या या सत्रात महागड्या मोपेडपासून ते स्कुटरपर्यंत सर्वच वाहनांचा समावेश आहे. पेठरोडवरील (Peth Road) दूर्गानगर येथील ज्ञानेश्वर पगार यांची मोपेड पार्किंगमधून लंपास झाली. तसेच शुभम विश्वकर्मा यांची दुचाकी अयोध्यानगरीतून दिवसाढवळ्या चोरीला गेली. तसेच, इंद्रकुंड भागातून हेरंब कुलकर्णी यांची स्कूटर (आणि सुदाम समशेर यांची दुचाकी गंगागोदावरी मंदिराच्या मागून लंपास करण्यात आली. यासह, चेतन जयस्वाल यांची मोपेड नेहरु गार्डन परिसरातून, तर मनोज यांची महागडी मोपेड गंगापूर रोडवरील कृषीनगर जॉगिंग ट्रॅक जवळून चोरीला गेली आहे.

दरम्यान, ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करत असल्याचा दावा पोलिसांनी (Police) केला आहे. मात्र, दुसरीकडे एकामागून एक सहा दुचाक्या गायब होणे, हे पोलिसांबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. चोरटे पोलिसांच्या गस्तीच्या वेळांचा अभ्यास करून हे कृत्य करत आहेत की काय? अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत. म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली आणि गंगापूर पोलीस ठाण्यांमध्ये (Gangapur Police Station) याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून, तपासाचे चक्र फिरवले जात आहेत.

वाहनधारकांनो,सावधान!

दुचाकी चोरट्यांचे हे आव्हन पाहता केवळ लॉकवर अवलंबून न राहता अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षित पार्किंग असतानाही होणाऱ्या या चोऱ्यांमुळे पोलिसांना आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...