नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आडगाव हद्दीतील छत्रपती संभाजीनगर रोडवरील (Chhatrapati Sambhajinagar Road) कपालेश्वर नगर परिसरातील अलिशान निर्माण नक्षत्र इमारतीतील घरात एका महिलेने उच्चभ्रूंसाठी वेश्या व्यवसाय सुरु ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पीसीबी एमओबीच्या (PCB & MOB) पथकाने धाड (Raid) टाकून दाेन पीडित मुलींची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसह एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे.
हे देखील वाचा : नाशकात महागणेशाेत्सव; ७५० सार्वजनिक मंडळांकडून नाेंदणी
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला (Woman) तिच्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी (Police) बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजताच पोलिसांनी बुधवारी (दि.४) रात्री कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली. तर वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी संशयित कविता साळवे-पाटीलसह जाफर मन्सुरी यास अटक केली.
हे देखील वाचा : Nashik Accident News : बोराळे फाट्याजवळ भीषण अपघात; तीन युवकांचा मृत्यू
दरम्यान, दोघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार(पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात दोघे संशयित पीडित मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यास प्रवृत्त करीत होते. हवालदार समीर चंद्रमोरे, अंमलदार प्रजीत ठाकूर, मनिषा जाधव, वैशाली घरटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हे देखील वाचा : पुन्हा हिट अँड रन! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव कारनं चिरडलं
संशयित महिलेची इमारतीतील रहिवाशांना दमदाटी
संशयित महिलेने इमारतीतील रहिवाशांना दमदाटी, शिवीगाळ केली. सायंकाळ झाल्याने पोलिसांनी संशयित महिलेस बुधवारी गुन्हा दाखल करून सोडले. त्यानंतर संशयित कविता साळवेने इमारतीच्या अध्यक्षांसह इतर फ्लॅट धारकांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच ‘आता मी पुन्हा वेश्याव्यवसाय करेल कोणाला काय करायचे ते करा’ असे बोलून पोलिसांनाही घाबरत नसल्याचे सांगत आव्हान दिले.
पोलिस ठाण्यात ठिय्या
संशयित महिलेने दमदाटी, शिवीगाळ केल्याने इमारतीतील ६० ते ६९ रहिवाशांनी संतप्त होत आडगाव पोलिस ठाण्यात जात तेथे ठिय्या देऊन कठोर कारवाईची मागणी केली. तसेच संशयित महिलेस पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा