चासनळी (वार्ताहर) –
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशावरून चासनळी आठवडे बाजारात मास्क न घालणार्या लोकांवर
अचानक कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील आठवडे बाजार पश्चिम भागातील सर्वात मोठा बाजार असतो मध्यंतरी कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे बाजारात येणारे लोक जणू मास्क विसरले होते मात्र कोरोना चा वाढता प्रभाव बघता पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव व पीएसआय सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क ना घालणार्या बाजार करूवर अचानक दंडात्मक कारवाई त्यामुळे बाजारात अचानक खळबळ उडाली सुस्त झालेली जनता मास्क शोधू लागली. मात्र ऐनवेळी पकडले गेलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. मात्र पुढील वेळेस सापडल्यास केस दाखल करण्याची तंबी पोलिसांनी दिली. याकामी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशीद पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी सहभाग घेतला.