Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रविनापरवाना गाळप केल्यास प्रतिटन, प्रतिदिवस हजाराचा दंड

विनापरवाना गाळप केल्यास प्रतिटन, प्रतिदिवस हजाराचा दंड

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

राज्यातील साखर कारखान्यांना चालु गळीत हंगामासाठी गाळप परवाना घेण्यासाठी आँनलाईन अर्ज सादर करण्याची ३० सप्टेंबरची मुदत सध्या संपली आहे. ज्या कारखान्यांनी ऊसगाळप परवाने घेतलेले नाहीत आणी त्या कारखान्यांनी गाळप सुरु केले तर या कारखान्यांना गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन, प्रतिदिवस एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यातील साखर कारखान्यांना सन 2020-21 च्या हंगामासाठी ऊस गाळप परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. विना परवानगी गळीत हंगाम सुरू केल्यास गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन प्रति दिवस एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

कारखान्यांना पुर्वहंगामी कर्ज आणी थकहमी मिळाल्याने हंगाम सुरु होण्याचा मार्ग खुला झाला असला तरी मागील कर्जाचे हप्ते यंदाच्या हंगामातील पहिल्या उचलीतुन वजा होणार आहेत. त्यामुळे एफ.आर.पी.देण्यास टँगीगमुळे रक्कम कमी उपलब्ध होणार आहे. कायद्यानुसार चौदा दिवसात एफ.आर.पी.देणे अशक्य आहे. कोवीडमुळे तोडणी मजुर दवाखाना खर्च, वहातुक खर्च पगार हा खर्च उपलब्ध रक्कमेतुनच भागवावा लागणार आहे. त्यामुळे एफ.आर.पी.साठी कमी रक्कम शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी आणी कारखानदार यांच्यात समन्वयकाची गरज आहे.

अनंत निकम ,कार्यकारी संचालक राजाराम कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या