Thursday, May 2, 2024
Homeनाशिकडेब्रिज फेकणार्‍यांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई

डेब्रिज फेकणार्‍यांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई

नाशिक | Nashik

स्वच्छ सर्व्हेणात देशातील दहा स्वच्छ शहरात येण्याचा नंबर हुकण्यास कारणीभूत असलेल्या जागो जागी फेकल्या जाणार्‍या बांधकामाचा मलबा (डेब्र्रीज) प्रश्न सोडविण्याचे महापालिकेचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे.

- Advertisement -

बांधकाम मलबा व्यवस्थापनसंदर्भातील निवीदा प्रक्रिया सुरू असली तरी महापालिका प्रशासनाकडुन शहरात मोकळ्या जागेत डेब्रीज टाकल्यासंदर्भात गेल्या एप्रिल ते नोव्ंहेंबर या काळात 96 केसेस करीत 1 लाख 89,640 रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे आता डेब्रीज अस्वच्छतेला लगाम लावला जात आहे.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील बांंदकामाच्या मलब्याचा प्रश्न गंभीरतेने घेत काम सुरू केले आहे. त्यांनी शहरामध्ये जुने बांधकाम पाडल्यानंतर त्यातील दगड, विटा, वाळू, खडी, गज, पत्र्यांचे तुकडे इतरत्र फेकून शहर विद्रूप करणार्‍या बांधकाम करणार्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

यात डेब्रिज निर्माण करणार्‍यांना त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला आता प्रति टन 800 रुपये मोजावे लागणार आणि या नियमांचा भंग केल्यास संबंधितांकडून दहा पटीने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांकडून घराचे बांधकाम केले जात असुन जुने बांधकाम पाडल्यानंतर या बांधकामाचे अवशेष शिल्लक खडी, वाळू, डबर, विटांचे तुकडे, गजांचे तुकडे आदी इतरत्र रस्त्याच्या कडेला फेकून दिले जाऊन शहर अस्वच्छ होत असल्याने आता महापालिका प्रशासनाकडुन जोरदार कारवाई सुरू आहे.

यात गेल्या नऊ महिन्यात नऊ केसेस करीत 1 लाख 89 हजार 640 रुपयाचा दंड वसुल केला आहे. यात गेल्या पंधरा दिवसात महापालिकेकडुन 42 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या