Sunday, May 19, 2024
Homeनाशिकनाशकात उपचाराअभावी गर्भवती महिलेची हेळसांड, अर्भकाचा मृत्यू

नाशकात उपचाराअभावी गर्भवती महिलेची हेळसांड, अर्भकाचा मृत्यू

सटाणा |तालुका प्रतिनिधी | Satana

तालुक्यातील आदिवासी गर्भवती महिलेची उपचाराअभावी सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रसूती होऊन नवजात अर्भक दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जुनी शेमळी येथील मनीषा समाधान सोनवणे (32) या गरोदर आदिवासी महिलेला तीच्या कुटुंबियांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ नसल्याचे कारण देत, कळवण अथवा मालेगाव रुग्णालयात हलविण्यासंदर्भात सांगण्यात आले.

यानंतर रुग्णवाहिकेत असलेल्या सदर महिलेची ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रसूती झाली, यावेळी बाळ दगावल्यामुळे महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटली.

याबाबत माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी संबंधित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पीडित महिलेच्या आई व भाऊ यांनी रुग्णालयात आल्यानंतर तब्बल दोन तास वैद्यकीय उपचार मिळाले नाही, तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा आरोप केला.

दरम्यान, माजी आमदार संजय चव्हाण यांच्यासह, माजी नगरसेवक छोटू सोनवणे, निलेश पाकळे, निखिल खैरनार आदींसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात टाळे ठोकले होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत रुग्णालय प्रशासनाने बोलतांना, बाळाच्या हृदयाचे ठोके कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधित महिलेला इतरत्र हलविण्याची पूर्वकल्पना दिल्याचे डॉ. वर्षा आहेर व डॉ. अनुज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या