Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिकच्या युवकाने ७५० रुपयात तयार केले ‘पीपीई’ कीट; दिवसाला 2 हजार कीट...

नाशिकच्या युवकाने ७५० रुपयात तयार केले ‘पीपीई’ कीट; दिवसाला 2 हजार कीट निर्मिती

नाशिक । प्रतिनिधी

देशासह राज्यात पीपीई कीटचा प्रचंड तुटवडा असून चीनकडून त्याची मागणी केली जात आहे. मात्र, नाशिकच्या युवा उद्योजकाने त्याच्या कंपनीत ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीइ किट्स) निर्मिती केली आहे. अमोल चौधरी असे युवकाचे नाव असून दिवसाला तो दोन हजार कीट तयार करत असून त्याची किंमत ७५० रुपये इतकी किफायतशीर आहे. महाराष्ट्रासह इतर राज्याकडून कीटला मागणी वाढत आहे.

- Advertisement -

कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी संभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीइ किट्सची मोठया प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे करोनाशी दोन हात करणार्‍या आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो.

संकट ही संधी समजून नाशिकचा युवा उद्योजक अमोलने त्याच्या कंपनीत पीपीई कीट तयार करण्याचे काम सुरु केले. औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून पीपीइ किट्स तयार करण्याची परवानगी दिली. अमोलने कीटसाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीइ किट्स त्याच्या कंपनीत तयार केले.

दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यसाठी केली जात आहे. एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे.

डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीइ किट्स वापरावी लागतात. ते बघता अमोलने अवघ्या ७५० रुपयात कीट तयार केले आहे.केंद्र सरकारने ही पीपीइ किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या