Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकझिरवाळपुत्र गोकुळाची कमाल; पेठमध्ये राष्ट्रवादी पुन्हा, सेनेला पळता भुई थोडी...

झिरवाळपुत्र गोकुळाची कमाल; पेठमध्ये राष्ट्रवादी पुन्हा, सेनेला पळता भुई थोडी…

पेठ | वार्ताहर

मागील निवडणूकीत निर्विवाद वर्चस्व राखलेल्या शिवसेनेचा पेठ नगरपंचायतीतून यावेळी मात्र काढता पाय घ्यावा लागला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र पेठ नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात सेनेने नगरपंचायत गमावली असली तरी महाविकास आघाडीने मात्र सत्ता अबाधित राखली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही….

- Advertisement -

नगर पंचायत निवडणूक : नाशिक जिल्ह्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष

जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्व तयारी म्हणुन नगर पंचायत निवडणूक लढविण्यात आली. राष्ट्रवादीची धुरा आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुत्र गोकुळकडे सोपवून राजकारणाचा सोपान चालविण्याची जबाबदारी दिली.

पेठ नगर पंचायतीत कॉंग्रेसचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची मुसंडी

तर सेनेचे पदाधिकारी असणारे भास्कर गावीत यांनी याठिकाणी चालविली. यावेळी सेनेचे मातब्बर पदाधिकारी यांना आणून प्रचंड वातावरण निर्माण करण्यात आले. मात्र, निकालाने अनेकाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

माकपने गत वेळ पेक्षा १ जादा जागा जिंकली तर भाजपने १ जागा राखली. मात्र कॉंग्रेसला एकही जागा राखता आली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या