Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : पेठ पोलिसांनी वाहनासह पकडला लाखोंचा गुटखा

Nashik Crime News : पेठ पोलिसांनी वाहनासह पकडला लाखोंचा गुटखा

पेठ | वार्ताहर Peth

- Advertisement -

महाराष्ट्रात (Maharashtra) प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची (Gutkha) वाहनातून तस्करी करताना गुजरातमधून (Gujarat) नाशिककडे (Nashik) जाणारा तब्बल २ लाख ८८ हजार ८०८ रुपयांचा विमल व राजनिवास, मिराज गुटखा पकडण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या वडाळा येथील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार ठरला! कोअर कमिटीच्या बैठकीत ‘या’ नेत्याच्या नावावर एकमत

याबाबत अधिक माहिती अशी की, दि १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेदरम्यान गुजरातकडून महाराष्ट्राच्या हद्दीत आलेला निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक (एमएच ४८ बीएम ०२८२) याची संशयावरून तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचा माल आढळून आला. यात केसरयुक्त पान मसाला ३ गोणी त्यामध्ये ५ गोणीत प्रत्येकी ४७० रुपये किंमतीचे १२० पाऊच असा ५२ हजार २७२ रुपये किंमतीचा सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : लिफ्ट देणे भोवले; वृद्धास मारहाण करून लुटले

तर केशरयुक्त १५० रुपये किमतीचे ६४ पाऊच किंमत १९ हजार २०० रुपये,विमल तंबाखुच्या ३ गोणी किंमत १३ हजार ७२८ रुपये, विमलचे प्रत्येकी २२ रुपये किमतीचे २२ पाऊच किंमत ४ हजार ८४० रुपये, १ हजार ९५० रुपये किंमतीच्या तंबाखु गोण, १६ हजार ८०० रुपये किंमतीचे २ बॉक्स मिराज , १ हजार ६८० रुपयांचा राजनिवास पानमसाला,५ हजार १८४ रुपयांचा प्रिमीयम राजनिवास पानमसाला प्रत्येकी १९२ प्रमाणे २७ पाऊच, ४२० रुपयांची प्रिमीयम जाफरानी व १ हजार ५८४ रुपयांच्या जाफरानीसह १ लाख ५० हजारांचा छोटा हत्ती वाहन जप्त करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : अवघ्या तासाभराच्या पावसाने नाशिकमध्ये रस्ते तुंबले

दरम्यान, याप्रकरणी चालक सलीमखान भिकनखान (वय २८) रा. देवीचामाळ, दरेगाव, मालेगाव, अकीलखान इस्माइल खान (वय ४५) रा .वडाळागाव नाशिक, शेख अरीप शेख रा. वडाळागाव नाशिक (Nashik) या साथीदारांवर डी.डी जाधव यांच्या फिर्यादीवरून भादंड न्याय संहिता १२३, २७४ , २७५ , २३३ (३ ), (५) अन्न सुरक्षासह मानके कायद्याचे उल्लंघन ३० (२ )(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या