Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचा दर

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचा दर

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel price hike) होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी (petroleum companies) आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Disel) किमतींमध्ये अनुक्रमे ३५ आणि १५ पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रति लीटरच्या दरांमध्ये झाली.

दिल्लीतील (Delhi) पेट्रोलचा प्रति लिटर दर १०१.५४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०७.५४ रुपये तर डिझेल ९७.४५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. भोपाळमध्ये (Bhopal) पेट्रोलची किंमत १०९.८९ रुपयांवर तर डिझेल ९८.६७ रुपयांवर पोहोचली आहे.

कोलकात्यात (Kolkata) पेट्रोलचा दर १०१.७४ रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत ९३.०२ रुपये प्रति लीटर आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) पेट्रोलची किंमत १०५.५२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९७.९६ रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नई (Chennai), तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) पेट्रोलची किंमत १०३ रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेल ९५ रुपयांवर आहे.

भारतात इंधनाचे दर उच्चांकी पातळी गाठत असताना देशाचे नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (Oil minister Hardeep Singh Puri) यांनी पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. या उद्देशाने त्यांनी तेल उत्पादक राष्ट्रांशी (Oil-producing nations) संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. हरदीपसिंग पुरी यांनी गेल्या आठवड्यात कतारच्या (Qatar) ऊर्जामंत्र्यांना फोन केला आणि त्यांनी बुधवारी आपल्या संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) समकक्ष सुलतान अहमद अल जाबेर (Sultan Ahmed Al Jaber) यांच्याशी चर्चा केली.

हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटरवर (Twitter) लिहिले की, “ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा पुरवठा करणाऱ्यांना स्थिरता, निश्चितता आणि व्यावहारिकता या भावनेसाठी यूएई आणि इतर मैत्रीपूर्ण देशांसमवेत जवळून काम करण्याची आमची इच्छा आहे,” असंही पुरी यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या